आमदार जोरगेवार यांच्या प्रयत्नांमुळे अखेर ''ती'' पोहचली घरी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ मे २०२०

आमदार जोरगेवार यांच्या प्रयत्नांमुळे अखेर ''ती'' पोहचली घरी
गौतम धोटे/आवारपूर
कोरपना तालुक्यातील वडगाव येथील विद्यार्थीनी "पौर्णिमा मधुकर काकडे" ही स्पर्धा परिक्षेच्या तयारी साठी भुसावळ येथे वास्तव्यास होती.लॉकडाऊन नंतर तिला घरी परतायचे होते.अनेक अडचणी व मानसिक त्रासाला ती सामोरे जात होती.याच दरम्यान तिचे कुटुंबीय प्रयत्नांची पराकाष्टा करीत होते.तब्बल 10 दिवस सातत्याने प्रयत्न केल्यानंतर संबंधित मुलीचा भाऊ "रामचंद्र काकडे" यांनी त्यांच्या एका मित्राला फोन करून आपबिती सांगितली. त्या मित्राने ही बाब चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचे जवळचे सहकारी चेतन खोके यांना फोन करून याबाबत आमदार जोरगेवार यांना माहिती द्यावी असे कळवले.आमदार जोरगेवार यांनी अडचण जाणून घेतली व जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक यांच्याशी संपर्क साधून मुलगी भुसावळ येथे एकटी असल्याने मानसिक त्रास होत असल्याचे कळवले.त्यानंतर भुसावळ हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत येत असल्याने तेथील कार्यालयाशी चंद्रपूर प्रशासनाने संपर्क साधला आणि या मुलीला घरी परतण्याची परवानगी मिळाली.बऱ्याच दिवसांनी घरी परतल्यानंतर कुटुंबियांच्या डोळ्यात चक्क पाणी आले. प्रशासनाच्या सूचनेवरून ती पुढील 14 दिवस क्वारंटाईन राहणार असून तिची प्रकृती ठणठणीत आहे.काळजीचे काही कारण नाही. अशा संकटसमयी कोरपना तालुक्यातील मुलीला चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मोलाची मदत केल्याबद्दल काकडे कुटुंबीयांनी आमदार जोरगेवार आणि त्यांचे सहकारी मित्र चेतन खोके यांचे मनापासून आभार मानले आहे.