गिट्टी खदानीच्या खड्डयातील पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

गिट्टी खदानीच्या खड्डयातील पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू
◼वरोरा तालुक्यातील चरूर(खटी) येथील घटना

वरोरा(शिरीष उगे)
मृतकाचे वडील शेतात बैलबंडीत माती भरून गेले.आणि माती खाली करून बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले असता,मागून मृतक बालक येण्याची यत्किंचितही कल्पना वडिलांना नव्हती.काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि मृतकाचे वडील पाणी असलेल्या खड्डयाकडे वळले तर मृतक विद्यार्थी बालक 30 फूट खड्डयात पडल्याचे लक्षात आले.परंतु ,त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. मृतकाचे नाव अनुश किरण ठाकरे वय 7 वर्ष,चरूर( खटी),ता.वरोरा,जिल्हा चंद्रपूर,घटना 15 मे ला सायंकाळी 6.00 वाजताचे सुमारास घडली.
वरोरा तालुक्यातील चरूर खटी येथे गेली 30 वर्षांपासून जवळपास 40 एकरात तीन व्यावसायिकांचे गिट्टी क्रेशर(खदान) असून,याठिकाणी 30, ते 35 फुटाचे खोल खड्डे पडले आहे.त्या खड्ड्यामध्ये बाराही महिने पाणी साचून असतात.आणि नेमका येथील गिट्टी खदानी चा खड्डा विदयार्थी बालकाचा जीव जाण्यास कारणीभूत ठरला.15 मे ला रात्रो 11.30 ला ग्रामस्थांच्या सहकार्यांनी बालकाचा मृत्यूदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला.

मृतकाचा नकळत मृत्यू

मृतकाचे वडील, आजोबा शेतीकामात असतांना मृतक बालक शेतात आले हे कुणालाही माहीत नाही. बालक शेतात आला आणि नकळत खड्डयात पडून पाण्यात बुडून त्याचा करुण अंत झाला.

जीवघेणी ठरत आहे गिट्टी खदानीचे खड्डे
40 एकराचे परिसरात मोठ्या संख्येने खोलीचे खड्डे असून,या खड्ड्यांमध्ये पाणी साचून असतात. नकळत या खड्ड्यात पडले तर जीवहानी होत असल्याचे प्रकार अनेकदा घडले आहे .या पूर्वी याच खदानीचे खड्ड्यात पडून पाच व्यक्तींचे मृत्यू झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
वरोरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.मृतकाचे शवविच्छेदन उपजिल्हारुग्णालय वरोरा येथे करण्यात आले. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरोरा पोलीस करीत आहे.