चंद्रपूरकरांसाठी खुशखबर; आता सकाळी मिळणार मासे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

चंद्रपूरकरांसाठी खुशखबर; आता सकाळी मिळणार मासे

७ ते २ या वेळेत करता येणार मासेविक्री
चंद्रपूर ५ मे - चंद्रपूर शहरातील मासेमारी करणारे व मासे विक्रेते यांना लॉक डाउनच्या काळात सकाळी ७ ते दुपारी २ या कालावधीत मासे विक्री करता येणार आहे. यापुर्वी मासेविक्री दुपारी २ ते ४ या कालावधीतच करता येत होती, मात्र आता मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार इतर जीवनावश्यक वस्तूंबरोबरच मासेविक्रीही सकाळी ७ ते दुपारी २ या कालावधीत करता येणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात गतीने पसरत आहे. असे दिसून येत असल्याने राज्य शासनाने कोरोना विषाणू (कोविड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा लागु केलेला आहे.
सद्यस्थितीत खाद्य पदार्थ, किराणा, दुध, दुग्धजन्य पदार्थ विक्री व वाहतुक, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे, बेकरी, पशु खाद्य यांची किरकोळ विक्री सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंतच सुरु राहतील असे आदेशीत केलेले होते मात्र त्यात बदल करून मासे विक्री करण्याच्या वेळेत अंशत: सुधारणा करुन मासे विक्रीची सुधारीत वेळ ही दुपारी 02.00 ते 04.00 अशी ठरवुन देण्यात आलेली होती. मात्र ३० एप्रिल रोजीच्या मा. जिल्हाधिकारी यांच्या सुधारित आदेशानुसार आता मासे विक्रीकरिता ठरवुन देण्यात आलेली वेळ सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 अशी कायम करण्यात येत आहे.