कोरोना लढ्यास योगदान:चंद्रपूर मनपा कर्मचारी पतसंस्थेद्वारे ११,००० ची मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ मे २०२०

कोरोना लढ्यास योगदान:चंद्रपूर मनपा कर्मचारी पतसंस्थेद्वारे ११,००० ची मदत
चंद्रपूर:
 कोरोनाच्या लढ्यास महानगरपालिकेच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत चंद्रपूरच्या वतीने ११,००० रुपयांचा धनादेश मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतानाच याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका स्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. मनपाचे अधिकारी कमर्चारी मागील दोन महिन्यांपासून पूर्णवेळ कार्यरत आहेत व विविध मार्गांनी नागरीकांची मदत करण्यास प्रयत्नरत आहेत.

मनपाच्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी देशभर लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य गरीब व गरजूंना चांगल्या आरोग्यसेवा देता याव्यात याकरीता आर्थिक सहाय्यरुपी खारीचा वाटा म्हणून पतसंस्थेने ११,०००/- चा धनादेश दिल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. भुपेश गोठे यांनी सांगितले. याप्रसंगी श्री. कवडु नेहारे, प्रदीप मी,मडावी उपस्थीत होते.