लाॅकडऊनला कंटाळून व्यावसायिक चांङक यांची आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मे २०२०

लाॅकडऊनला कंटाळून व्यावसायिक चांङक यांची आत्महत्या

राजु चांडक
सावनेर -
कोव्हिड -19 विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने देशात लाॅकडाऊन घोषीत केले. या 40 दिवस लोटूनही लाॅकडाऊन न उघडल्याने नेहमीच्या बंद ला त्रासून सावनेर येथील कापड व्यापा-याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. राजु चांडक (44) आत्महत्या करणा-या तरूण व्यापा-याचे नांव आहे.

जगात कोव्हिड -19 या विषाणूने मागील पाच सहा महीन्यांपासून थैमान धातले आहे. भारतातही या जिवघेण्या विषाणूचा फैलाव मोठया प्रमात होत असल्याने व यावर औषधोपचार नसल्यामुळे यावर काही उपाय योजना शोधण्या करीता भारत सरकारला देशात लाॅकडाऊन चा निर्णय घ्यावा लागला.

परंतू या लाॅकडाऊनला 40 दिवस लोटल्यानंतर देशात निर्माण झालेल्या अनेक समस्यांमुळे मानसिक खच्चीकरण होऊन सावनेर गडकरी चैकातील कपडा व्यापा-याने रात्री 2 च्या सुमारास पत्नीला गर्मीमुळे बाहेरील खोलीत झोपतो असे सांगून रूमच्या शटरच्या वरील राॅड ला ओढणीने गळफास घेउन आत्महत्या केली.

सकाळी राजूने खोलीचे दार न उघउल्याने घरच्यांनी शटर खालून बघीतले असता राजुचे पाय लटकतांना दिसले. त्यामुळे सावनेर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यावेळी घराचे दार तोडून त्याला सावनेर रूग्णालयात नेण्यात आले. डाॅक्टरांनी राजूला मृत घोषीत करीत त्याचा मृतदेह शवविच्छेदना करीता पाठविण्यात आला. 

राजूच्या पश्च्यात पत्नी व 12 वर्षाची एक मुलगी आहे. मृत्यूपूर्वीच्या लेखात त्याने लाॅकडाऊन ला त्रासून आत्महत्या करीत असल्याचे लिहीले आहे, असे सांगण्यात येत आहे.