समता, ममता व बंधुतेचा संदेश जगाला देणाऱ्या तथागतांना अभिवादन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ मे २०२०

समता, ममता व बंधुतेचा संदेश जगाला देणाऱ्या तथागतांना अभिवादन
नवेगावबांध येथे तथागत गौतम बुद्ध जयंती उत्साहात साजरी

संजीव बडोले/नवेगावबांध
दिनांक 7 मे 2020
नवेगावबांध:-क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते .असा मूलमंत्र अख्या जगाला देणारे तथागत गौतम बुद्ध यांची 2559 वी जयंती येथे उत्साहात साजरी करण्यात आली. बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते. ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची असते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे, ती कारणे म्हणजे... याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचं महानिर्वाण झालं होतं.प्रशिक बुद्धविहारात सामाजिक कार्यकर्ते भास्कर बडोले यांच्या हस्ते तर पंचशील बुद्ध विहार इंदिरानगर येथे नंदकुमार उके गुरुजी यांच्या हस्ते धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. संचार बंदी चे पालन करून बौद्ध बांधवांनी घरीच बुद्धपौर्णिमा उत्साहात साजरी केली घरासमोर सडासंमार्जन करून अंगणात रांगोळ्या काढून मोठ्या उत्साहात बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. प्रशिक बुद्धविहारात नगर बौद्ध समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे, उपाध्यक्ष राजेंद्र साखरे, कोषाध्यक्ष देवदास बडोले, समता सैनिक दलाचे हेमचंद लाडे, धम्मदीप साखरे, जगदीश शहारे उपस्थित होते. इंदिरानगर येथील प्रसिद्ध बुद्धविहारात उके गुरुजी,कमल घरडे,अतुल बडोले,उंदिरवाडे गुरुजी,यशवन्त बोरकर,नरेंद्र बोरकर,उदेभान राऊत,शैलेश शहारे,अशोक डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते धम्म ध्वजारोहणानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली व मिठाईचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे जेतवन बुद्ध भूमी येथे तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करून व सामूहिक बुद्धवंदना घेऊन भगवान बुद्धांना यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी नरेश बडोले, नवीन उके, योगीराज टेंभुर्णे, खेमराज भैसारे, दिनेश जांभुळकर ,आनंद जनबंधु, बादल शहारे, मोटघरे उपस्थित होते. संचार बंदीमुळे दोन्ही बुद्धविहारात सामाजिक अंतर पाळण्यात आले होते.