नवेगावबांध येथे भाजपाचे माझे अंगण माझे रणांगण, महाराष्ट्र बचाव आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ मे २०२०

नवेगावबांध येथे भाजपाचे माझे अंगण माझे रणांगण, महाराष्ट्र बचाव आंदोलन

संजीव बडोले/नवेगावबांध.

दिनांक 22 मे 2020.
नवेगावबांध:-राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार अपयशी ठरले आहे. असा आरोप करीत,कोरोना महामारीचे संकट राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या महामारीला रोखण्यात राज्यातील ठाकरे सरकारला अपयशी झाल्याचे सांगत राज्यातील भाजपने सरकारविरोधात आंदोलन पुकारले. नवेगावबांध येथे सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, माजी जिल्हा परिषद सदस्य विजयाताई कापगते, मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक केवळराम पुस्तोडे डॉ. गुलाब डोंगरवार ,अण्णा डोंगरवार ,महादेव बोरकर ,खुशाल काशीवार,पोवळे व भाजपा कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून ठाकरे सरकारचा निषेध नोंदविला आहे.
ठाकरे सरकारविरोधात आपापल्या घराच्या अंगणात उभे राहून काळ्या फिती, रिबन, काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन ठाकरे सरकारचा निषेध नोंदवा, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले होते. ‘माझं अंगण रणांगण’, ‘महाराष्ट्र बचाव’ या आंदोलनात राज्यातील भाजपच्या नेत्यांनी सहभाग नोंदवला.कोरोना महामारीविरुद्धच्या लढ्यात महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. कोरोनाला रोखण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. संकट मोठे आहे म्हणून सहकार्य करा, असे सरकारकडून वारंवार सांगितले जात होते. आम्ही आणि सामान्य जनतेनेही सहकार्य केले. परंतू, आता लोकांच्या मनातील राग अधिक काळ लपवून राहू शकत नाही, असेही पाटील म्हणाले होते व भाजपा कार्यकर्त्यांना, नेत्यांना हे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन केले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत नवेगाव बांध ,केशोरी ,अर्जुनी मोरगाव,तावशी,इंजोरी याठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निषेध घोषणांचे फलक हातात धरून काळे झेंडे दाखवून आंदोलन केले.