कमलापूर येथील मुख्य चौकात नक्षली बॅनर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ मे २०२०

कमलापूर येथील मुख्य चौकात नक्षली बॅनर
गडचिरोली:- धानोरा तालुक्यात चार वाहनांची जाळपोळ केल्यानंतर आज पहाटे कमलापूर येथील मुख्य चौकात नक्षली बॅनर आढळून आले.यामध्ये २२ मे पर्यंत जिल्हा बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
गेल्या आठवड्यात भामरागड तालुक्यात झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलीस दलातील दोन जवान शहीद झाले. त्यानंतर धानोरा तालुक्यात नक्षल्यांनी चार वाहनांची जाळपोळ करून रस्त्यावर झाडे तोडून टाकली.
अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील मुख्य चौकात काल राञी ठीकठीकाणी बँनर लावले तर पत्रके टाकून २३ मे पर्यंत जिल्हा बंद पाळण्याचे फर्मान सोडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच गडचिरोली जिल्ह्यात सध्या नक्षल्यांचा धुमाकूळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.