स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट खाण्याअयोग्य तांदळाचे वितरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट खाण्याअयोग्य तांदळाचे वितरण
पुरवठा विभागा मार्फत चौकशी सुरू

लाभार्थ्यांची पुरवठादारावर कारवाई करण्याची मागणी


संजीव बडोले/नवेगावबांध
दिनांक 16 मे 2020.
नवेगावबांध:-कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून लॉक डाऊन व संचारबंदी राज्यात सुरु आहे. या कालावधीत सर्व रोजगार धंदे बंद आहेत.त्यामुळे देशातील बेरोजगार झालेल्या नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारच्या सहकार्याने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून मोफत अन्नधान्य देण्यास सुरुवात केली आहे. परंतु प्रेताच्या टाळु वरचे लोणी खाण्याचा गोरखधंदा काही स्वार्थी वृत्तीच्या व्यापाऱ्यांनी सोडला नाही. कोरोनाव्हायरसच्या संघर्षात गेल्या दीड महिन्यापासून रोजगार करणारे गरीब गरजू नागरिक रोजगारा अभावी गेल्या दीड महिन्यापासून घरीच बसून आहेत. हातावर कमावून,पानावर खाणारे अशा मजूर, अडलेल्या नडलेल्या गोरगरीब नागरिकांची तर आर्थिक कुचंबणा सुरू आहे .अशा अवस्थेत शासनाने स्वस्त धान्य दुकानातून पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत अशा गरजूंना मोफत धान्य वितरणाची योजना मागील महिन्यापासून राबविण्यात येत आहे. आज दिनांक 16 मेला येथील काही येथील लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात मोफत धान्य उचलण्यासाठी गेले असता, त्यांना खूप जुने, खंडा मिश्रित,पाखर तर काही अळ्या मिश्रित अन्नधान्य देण्यात येत होते. परंतु लाभार्थ्यांनी आम्ही या निकृष्ट दर्जाच्या खाण्यायोग्य नसलेल्या अन्नाधान्याची उचल करणार नाही असे सांगितले. सदर तांदळाचा पुरवठा माया राईस मिल खमारी गोंदिया यांचेकडून करण्यात आला आहे. कोव्हीड- 19 कोरोना व्हायरस च्या काळात केशरी व पिवळे कार्ड धारकांना प्रति व्यक्ती ५किलो मोफत तांदुळ देण्याची सरकारची योजना आहे. राशन घेण्या करिता कार्डधारक सरकारी स्वस्त दुकानात गेले असता, त्यांना निक्रूष्ठ दर्जाचे तांदुळ जे खाण्यास अयोग्य आहेत असे वाटप केल्या जात होते. ही बाब त्यांनी सरपंच अनिरुद्ध शहारे यांना सांगितले. त्यांनी दुकानात जाऊन चौकशी केली कार्डधारकांनी निक्रुष्ट दर्जाच्या तांदळाची ऊचल करणार नाही असे लाभार्थ्यांनी सांगितले. सरपंचांनी अर्जुनीमोर च्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनोले व तहसीलदार अर्जुनामोरचे विनोद मेश्राम यांना दुरध्वनी वरुन संपर्क करून स्वस्त धान्य दुकानात निक्रुष्ट दर्जाच्या पुरवठा करण्यात आलेल्या तांदळाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तालुका निरिक्षक काळे व नायब तहसीलदार मुनेश्‍वर गेडाम  यांनी गोदाम किपर मोहुर्ले यांना चौकशी करीता पाठविले महसुल विभागाच्या कार्यवाही कडे जनतेचे लक्ष लागले आहे.गोंदिया जिल्हयात धानाचे उत्पादन मोठ्याप्रमाणात होते.त्या धानाची खरेदी मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फेत केल्यानंतर सदरचा धान राईसमिलर्सला मिलिंगकरिता देऊन शासन तो तांदूळ खरेदी करतो.त्या तांदळाची गुणवत्ता सुध्दा असायला हवे असे नियम आहे. 

अर्जुनी मोरगाव तालुक्यात अनेक राईस मिल असून सुद्धा , गोंदिया जिल्ह्यातील राईसमिलर्स असोशियनच्या एका वरिष्ट पदाधिकारी असलेल्याच्या मालकीच्या राईस मिल मधून गुणवत्ता नसलेला तांदुळ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील गोदामात  पुरवठा करण्यात आल्याचे वृत्त हाती आले आहे.सीएमआर अंतर्गत निकृष्ठ दर्जाचा तांदुळ पुरवठा करता येत नाही,परंतु राजकीय दबाव व लाॅबीचा वापर करुन नेहमीच असे केले जाते, त्यात अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी गुंतले असल्याचे समजते. त्यानुसार आज सुध्दा असाच प्रकार घडला.मात्र स्थानिक पुरवठा अधिकारी यांनी तो निकृष्ठ दर्जाचा तांदळाचा पंचनामा तयार करायला सुरवात केली आहे.दरम्यान आपल्यावर कारवाई होऊ नये, यासाठी सदर मिलमालक राजकीय लागेबांधे वापरायला सुरवात केल्याचे वृत्त आहे. अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नेहमीप्रमाणे चौकशीचा फार्स उभा करून सदर पुरवठादाराला अभय दिले जाणार?.ज्या सरकारी रास्त दुकानातून अशा तक्रारी आलेल्या आहेत.त्यां स्वस्त धान्य दुकानदारांना बळीचा बकरा बनवला जाणार. चोर सोडून संन्याशाला फाशी देणार?  अशाप्रकारची सारवासारव सुरू असल्याची  अशीही चर्चा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार व नागरिकात आहे .नागरिकांनी तसेच अनेक सामाजिक संघटनानी निकृष्ठ तांदुळ पुरवठा करणार्या मिलमालकावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावे, तसेच  गेल्या अनेक वर्षापासून  असा प्रकार सर्रासपणे चालवणाऱ्या  अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या  अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी  व दोषींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली जात आहे. लंबी पार्टी है कुछ नही होगा. अशीही चर्चा  स्वस्त धान्य दुकानदारात छुप्या आवाजात सुरू आहे. दरम्यान अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांना विचारणा केल्यावर निकृष्ठ तांदळाचा पुरवठा झाल्याची तक्रार असून त्याप्रकरणात नवेगावबांध येथे पुरवठा विभागाचे कर्मचारी कार्यवाई करीत आहेत,अहवाल आल्यानंतरच सत्य काय आहे ते कळणार? असे सांगितले जाते.