महाविद्यालयात दारू मटन पार्टी करताना आढळले प्राचार्य - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

महाविद्यालयात दारू मटन पार्टी करताना आढळले प्राचार्य


पडली पोलिसांची धाड; सावनेर हरिभाऊ आदमने महाविद्यालयातील घटनासावनेर ता. 30: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लाॅकडाऊन असतांना नागपूर जिल्हयातील सावनेर येथील डाॅ.हरिभाउ आदमने कलाव वाण्ािज्य महाविद्यालय येथे प्राचार्य विरेन्द्र जुमडे यांनी त्यांच्या काही सहकारी व मित्रांसोबत मिटींग च्या नावाखाली दारू व मटन पार्टी कल्याचे आढळून आल्याने हडकंप माजला आहे.

विद्येचे माहेरघर असलेल्या शिक्षण संस्थेत दिवसा शिक्षण रात्री मटन व दारू पार्टी करणा-या राष्ट्रविकास शिक्षण संस्थेद्वारे संचालीत सावनेर येथील हरिभाऊ आदमने कला वाणिज्य चे प्राचार्य विरेन्द्र जुमडे यांना सावनेर पोलीसांनी रंगेहात पकडल्याने महाविद्यालयाच्या आवारातून पळापळ सुरू झाली यामुळे हे महाविद्यालय पुन्हा चर्चेला आल्याने या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह विद्यापिठाच्या कुलगुरूवर नामुष्कीची वेळ ओढावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सावनेर येथील डाॅ.हरिभाऊ आदमने महाविद्यालयाला सुटी असली की सायंकाळी मटन व दारूवर नेहमीच ताव मारण्याचे प्रकार सुरू होते. या लाॅकडाऊनच्या काळात प्राचार्य विरेन्द्र जुमडे यांनी चक्क काही मर्जीतील प्राध्यापक व कर्मचा-यांना महाविद्यालयात बोलावून मटनावर ताव व दारूवर बार ऊडविण्याचा प्रकार सुरू असतांना महाविद्यालयाच्या एका पुर्व विद्याथ्र्याने हाप्रकार लपून बघीतला. याचीसावनेर पोलीसांत तक्रार नोंदविली या तक्रारीवर सावनेर पोलीसांनी धाड टाकून शिक्षणाच्या आड चालत असलेल्या या लाजिरवाण्या प्रकारावरील आवरण फाडून जनतेसामोर आदर्श बनून बसलेल्या या प्राचार्याचा खरा चेहरा नागरीकांपुढे आणल्याने शिक्षण क्षेत्रावर नामुश्कीची वेळ ओढावली आहे. प्राचार्याच्या या कृत्याचा अनेक विद्याथ्र्यांनी निशेध नोंदविला आहे.

यासंमधी सावनेर पोलीसांनी सर्वाचे बयान नोंदविणे सुरू केले असता प्राचार्यास महाविद्यालयाच्या आत दारू कशी आली अशी विचारणा केली असता प्राचार्य विरेन्द्र जुमडे हे उत्तर देवू शकले नाही.

यासंमधी राष्ट्रविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दामोदर पराते यांना विचारणा केली असता या घटनेची लेखी तक्रार माजी विद्याथ्र्यांनी केली आहे.सदर बाब ही गंभिर स्वरूपाची असून दोषींवर योग्यती कारवाई होईल असे सांगण्यात आले आहे.