राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे बोरखेडीत कोविड योध्यांचा सत्कार:फेस शिल्ड किट चे वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मे २०२०

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे बोरखेडीत कोविड योध्यांचा सत्कार:फेस शिल्ड किट चे वाटप

नागपूर : अरूण कराळे 
 नागपूर तालुक्यातील बोरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोना संसर्ग आजारावर मात करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कोविड योध्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र बोरखेडी ला  फेस शिल्ड किट चे वाटप करण्यात आले. 
कोरोना संसर्ग रोगावर मात करण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस विभाग, सफाई कर्मचारी, आशा वर्कर,  पत्रकार आदी आपल्या जीवाची बाजी लावून अहोरात्र कार्य करत आहेत अश्या कर्मचारी वर्गाचा माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते सत्कार करून फेस शिल्ड किट, सॅनिटायझर,मास्क,साबन  आदी प्रतिबंधक साहित्याचे वाटप करण्यात आले. 
 यावेळी जिल्हा परिषद सदस्य वृंदा प्रकाश नागपुरे,नागपूर  पंचायत समिती  उपसभापती संजय चिकटे, जीनीन प्रेसिंगचे अध्यक्ष प्रकाश नागपुरे,  डॉ. फटिंग मॅडम,  प्रकाश धंदे, राजेंद्र जीवतोडे, किशोर धुर्वे, राजू कोहळे, प्रशांत देवतळे, दीपचंद कांबळे, चरण काळे, प्रशांत कवळे, वसंतराव कवळे, बाबाराव शिंद, धीरज हांडे, प्रदीप धोटे, पंढरी मस्कर, विठ्ठल राऊत, शंकर मडावी आदी उपस्थित होते.