लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळा आटपून वारे माप खर्चाला कात्री लावा:खंड विकास अधिकारी किरण कोवे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळा आटपून वारे माप खर्चाला कात्री लावा:खंड विकास अधिकारी किरण कोवे

नागपूर/अरूण कराळे 
कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे लग्नसमारंभ थांबले आहे . प्रत्येक नागरीकांला लग्नसमारंभ धुमधडाक्यात साजरा व्हावा असेच वाटते परंतु आज तसे करणे शक्य नाही त्यामुळे लॉकडाऊन मध्ये लग्न सोहळा करून खर्चाला कात्री लावा असे आवाहन नागपूर पंचायत समीतीचे खंड विकास अधिकारी किरण कोवे यांनी केले .

नागपूर तालुक्यातील पिपळा,घोगली ग्रामपंचायतच्या सभागृहात सोशल डिस्टंसिंगचे पालन करून चि.लोकेश मेंढे राहणार काळडोंगरी यांचा विवाह चि.सौ.का .पिंकीताई मिस्कीन राहणार पिपळा यांच्या सोबत मंगळवार १९ मे रोजी २५ नागरीकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी लग्नसोहळा कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून खंड विकास अधिकारी किरण कोवे बोलत होते . विवाह सोहळ्याचे आयोजन सरपंच नरेश भोयर यांनी केले . यावेळी नगरसेवक भगवानजी मेंढे ,पं .स.सदस्य वैशाली भोयर,उपसरपंच प्रभू भेंडे,विस्तार अधिकारी श्री चव्हाण साहेब,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश भोयर,वनिता कावळे,ग्रामसेवक डी. एम.धारपुरे तलाठी विकास सावरकर प्रामुख्याने उपस्थित होते. आयोजनाकरीता दिलीप लेंडे,सुरेश बागडे,गिरीश राऊत,मंगेश भोयर,श्रावण कडू,मुकेश इंगळे,प्रकाश भोयर,सुशांत यादव,नरेश बागडे,आदींनी परिश्रम घेतले .