चंद्रपुरात पकडलेल्या 'त्या' तिघांचा कोरोना रुग्णांशी संबंध नाही - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

चंद्रपुरात पकडलेल्या 'त्या' तिघांचा कोरोना रुग्णांशी संबंध नाही

नागपूर/ललित लांजेवार:

नांदेडमध्ये कोरोना संशयित म्हणून उपचार घेणारे तीन रुग्ण हे फरार होऊन चंद्रपूर येथे आल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आपण ऐकली बघितली होती मात्र ही बातमी आता खोटी ठरली आहे.


नांदेडमधून फरार झालेल्या व चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरमधुन अटक करण्यात आलेल्या तिघांचा तपासणीनंतर कोरोना बाधितांच्या व त्यांचा काही संबंध नसल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.


नांदेड येथून फरार झालेले ते चौघे दूसरे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे कारण गुरुवारी एक आणि शुक्रवारी एक असे दोन फरार रुग्ण नांदेड पोलिसांच्या हाती लागलेले आहे.त्यामुळे गडचांदूर येथून नेलेल्या तीन संशयित रुग्णांना त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ज्या दिवशी या तीन कोरोना संशयित रुग्णांना नांदेड पोलिसांनी गडचांदूर येथून नांदेडला नेले त्याच दिवशी त्या तीनही संशयित रुग्णांनी पोलीस व्हॅनमध्ये बसून एक व्हिडिओ तयार केला होता. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले होते की आमचा आणि त्या पळून जाणाऱ्या व्यक्तीं चा काही संबंध नसून आम्ही गडचांदूरला ट्रक घेऊन आलेलो होतो मात्र आम्हाला ते आरोपी समजून पकडून पोलीस नेत आहेत आणि आम्हाला हेदेखील माहीत नाही की हे पोलीस आम्हाला कुठे नेत आहे. 

आम्हाला याबद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही.मात्र ज्यांनी आमची बदनामी केली त्यांच्यावर आम्ही नांदेड पोलिसात तक्रार दाखल करू असे देखील त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.हा व्हिडिओ त्यांनी स्वतः बनवून व्हायरल केला होता.

चंद्रपूर शहरात एका वेब पोर्टलने ते 3 रुग्ण कोरोना बाधित असल्याचा दावा केला होता. कोणतीही शहानिशा न करता छापलेल्या चुकीच्या बातमीमुळे चांगलीच धांदल उडाली होती, त्यानंतर या वेब पोर्टलवर चंद्रपूर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा देखील दाखल केला होता.