वाडीत मद्यपींची दारू खरेदीसाठी झुंबड:सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

वाडीत मद्यपींची दारू खरेदीसाठी झुंबड:सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा


 देशी दारूच्या दुकानपेक्षा विदेशी दुकानासमोर मोठी गर्दी
नागपूर / अरूण कराळे (खबरबात) 
चिननिर्मीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे संचारबंदी लागू झाली आहे . १८ मार्च पासून जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली होती. तेव्हा पासून दारूचे व्यसन असलेल्यांमध्ये शासनाच्या निर्णयाबाबत नाराजीचा सूर होता.लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्यात दारू विक्रीसाठी मंजुरी दिली असतांना नागपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी परवानगी नाकारली होती.त्यामुळे अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढत मद्यपी दारू मिळविण्यासाठी दुकाने फोडून दारूची चोरी करू लागल्याने शासनाचा महसुलही बुडू लागला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व उत्पादन शुल्क,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्यात बैठक होऊन काही अटी व शर्ती घालून जिल्ह्यात दारू विक्रीसाठी परवानगी देताच वाडी शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेली दुकानात विक्री सुरू होताच ग्राहकांची झुंबड उठून शारीरिक अंतराचा व शासनाने घातलेल्या नियमाचा फज्जा उडाला असून देशी दारूच्या दुकानापेक्षा विदेशी दारूच्या दुकानासमोर सकाळपासूनच गर्दी उसळली होती . 

जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार नगर परिषद व नगर पंचायत भागात टोकन व ऑनलाईन पध्द्तीने विक्री सुरू झाली असून परवाना धारकालाच दारू देण्याचा आदेश असताना कुणालाही दारू दिली जात होती.सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत दुकाने उघडी राहणार असली तरी दारूसाठी कित्येक दिवसापासून आतुर झालेल्या मद्यपिनी सकाळपासूनच दुकानासमोर रांगा लावुन दुकानदारांनी दुकानापुढे गर्दी होणार नाही शारीरिक अंतर पाळता यावे म्हणून रेखांकन करून गोल तयार केले 

परंतु दारू विक्रीचा पहिलाच दिवस असल्याने गर्दी वाढुन शारीरिक अंतराचा फज्जा उडाला.शहरातील काही दुकानात ग्राहकांची थर्मल सकॅनिग करून शासनाचे नियमाचे काटेकोरपणे पालन करून विक्री केली जात आहे तर काही दुकानात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे सरास उल्लंघन होत असल्याचे चित्र असले तरी इतक्या दिवसाच्या खंडानतर आज मनसोक्त दारु प्यायला मिळेल म्हणून रखरखत्या उन्हात दारू खरेदीसाठी उभे राहावे लागले तरी सर्वांचे चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते.

एकीकडे शहरातील दारूचे दुकान सुरू करण्याची परवानगी दिल्याने शासनाला महसूल मिळून अवैध दारू विक्रीवर आळा बसेल ही स्वागतार्थ असले तरी याशिवाय विविध व्यवसायाची दुकाने अजूनही बंद असल्याने संबंधित धंद्याचे व्यावसायिक यांच्यात नाराजी व चिंतेचे वातावरण आहे.जिल्हाधिकारी इतरही व्यावसायिकांच्या डगमगल्या आर्थिक स्थितीचा व त्या व्यवसायात कार्यरत कामगारांचा विचार करत बंद असलेली इतरही दुकाने अथवा व्यवसाय दिवसानुसार रोटेशन पध्द्तीने सुरू करण्याची मागणी जोर पकडत आहे.