चंद्रपूरच्या त्या पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ मे २०२०

चंद्रपूरच्या त्या पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल

ललित लांजेवार/नागपूर:
चंद्रपूर शहरात शनिवारी कृष्णनगर येथील एक 50 वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आला, याची शासनाने अधिकृतरीत्या माहिती माध्यमांना दिली, मात्र याच पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल हा चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रत्येक व्हाट्सअप ग्रुपवर व सोशल मीडियावर व्हायरल झाला.

प्रशासनाने या व्यक्तीचे नमुने शुक्रवारी तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते त्याचा रिपोर्ट शनिवारी रात्री 8.30 वाजता पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून आला. मात्र लगेच हा रिपोर्ट जिल्ह्याच्या प्रत्येक सोशल मीडियाच्या व्हाट्सअप ग्रुप वर दिसू लागला.त्यामुळे या व्यक्तीची ओळख ही जनसामान्यात आली.त्याचं नाव देखील तर रिपोर्टकार्ड वर असल्यामुळे ते देखील दिसू लागले.आणि लोकांमध्ये त्याच्या नावाची आणि त्याच्या कामाबद्दल व्हाट्सअप ग्रुप वर चर्चा होऊ लागली.

हा व्यक्ती काम करत असलेल्या सदनिकेचा देखील पत्ता आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेला आहे

विशेष म्हणजे कोरोनाग्रस्त व्यक्तीची ओळख ही माध्यमात किंवा सोशल मीडियावर व्हायरल करायची नाही असा नियम आहे.त्याचं कारण म्हणजे समाजाचा त्या कोरोना बाधित रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो व त्यांचा मानसिक छळ होतो.


त्यामुळे अशा अनेक गोपनीय गोष्टी ज्या लोकांमध्ये यायला नको अशी गोष्ट म्हणजे चंद्रपूरच्या त्या कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल चंद्रपूरच्या प्रत्येक व्हाट्सअप ग्रुपवर 9 वाजेपासून फिरू लागला.आणि त्यामुळे या रुग्णांची ओळख आणि त्याचं नाव अशी संपूर्ण माहिती लोकांच्या व्हाट्सअप वर बघायला मिळाली.

त्यामुळे प्रशासनाकडून आलेला हा अहवाल सामान्य जनतेत पोहोचला तरी कसा? या रिपोर्टला व्हायरल करणारे व्यक्ती कोण?याचा शोध घेतला पाहिजे.अन्यथा यानंतर देखील असेच पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल माध्यमात येऊन त्यांची नाव लोकांसमोर येतील.

 आणि त्यांना त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा लोकांचा वेगळा होत जाईल. त्यामुळे आता कोरोनाचा हा पॉझिटिव्ह रिपोर्ट कोणी सोशल मीडियावर व्हायरल केला आणि असे करणार्‍यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.