मन सुन्न करणारी घटना,आई जेवण चारून देत होती;आणि तितक्यातच तो चौथ्या माळ्यावरून पडला खाली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

मन सुन्न करणारी घटना,आई जेवण चारून देत होती;आणि तितक्यातच तो चौथ्या माळ्यावरून पडला खालीदवलामेटीत चौथ्या माळ्यावरून पडल्याने मुलाचा करुण अंत 
हिल टॉप कॉलनी मधील घटना
आई गॅलरीत जेवण चारत होती 
वडील मेघालय सीमेवर बीएसएफमध्ये
नागपूर / अरूण कराळे (खबरबात ):
नागपुरात प्रत्येकाला हळहळ करून मन सुन्न करून सोडणारी घटना शुक्रवारी घडली.आईच्या डोळ्यासमोर पोटच्या मुलाचा मृत्यू झाला. 
पोलीस स्टेशन वाडी अंतर्गत येणाऱ्या दवलामेटी हिलटॉप कॉलनीत आई सव्वा वर्षाचा मुलगा वेद सुरेश सलामे यास जेवण चारत असतांना चौथ्या माळ्यावरून खाली पडल्याने मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजून हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

प्राप्त माहितीनुसार दवलामेटी हिलटॉप कॉलनी येथील रहिवासी सुरेश सलामे हे मेघालय येथे बीएसएफ जवान म्हणून कर्तव्यावर आहे .त्यामुळे मृतकाची आई मेघा चार वर्षाची मोठी मुलगी व मृतक सव्वा वर्षाचा वेद यांच्यासह राहत होती.

नेहमीप्रमाणे शुक्रवार १५ मे रोजी सकाळी ९ .३०चे सुमारास चौथ्या मजल्यावरील गॅलरीत ती आपल्या मुलांना खायला घालत होती. मुलाला एका स्टूलवर बसवले होते. नेहमीच तिथे बसून त्याला खायला घालायची. मुलाचा अचानक ताबा सुटला आणि मुल चौथ्या मजल्यावरून खाली पडला.हे दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहता ती कावराबावरा होऊन जोरात किंचाळली असता शेजाऱ्यांनी तिच्याकडे धाव घेतली मुलाला उचलून ताबडतोब नागपूरच्या खासगी रुग्णालयात नेले तेव्हा शाश्वोच्छ्वास चालू असल्याने डॉक्टरांनी तात्काळ मुलांना आयसीयूमध्ये नेले पण अर्ध्या तासातच मुलाचा मृत्यू झाला.

धंतोली पोलिसांनी वाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली.मृतक वेदचे वडील सुरेश यांनाही दुःखद घटनेची माहिती देण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रेखा संकपाळ पुढील तपास सुरू आहे.