स्वस्त धान्याच्या दुकानातून मांसाहारी पदार्थ विक्रीची परवानगी रद्द करा:महानुभाव पंथीयांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

स्वस्त धान्याच्या दुकानातून मांसाहारी पदार्थ विक्रीची परवानगी रद्द करा:महानुभाव पंथीयांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नागपूर/अरूण कराळे:
निती आयोगाने १५ वर्षांकरिता व्हिजन डाक्युमेंट २०३५ लागू करून स्वस्त धान्याच्या दुकानातून मांसाहारी पदार्थ विक्रीला परवानगी दिली असल्याने महानुभाव पंथीयांनी संताप व्यक्त करत नागपूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र ठाकरे यांना निवेदन देऊन ही परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे.ही माहीती वाडी प्रेस क्लब येथील कार्यालयात दिली.

संपूर्ण देशात महानुभाव पंथीय व इतर पंथीयांचे अनुयायी मोठ्या संख्येनी आहेत त्याचप्रमाणे समाजातील शाकाहारी पदार्थ सेवन करणारे अनेक लोक वास्तव्य करीत असून असे अनेक साधू संत,वेगवेगळ्या पंथाचे अनुयायी एखादा दुकानात अंडी विक्रीला ठेवली असेल त्या दुकानातून कोणतेही साहित्य खरेदी करत नाही,

तो समाजातील घटक राशन दुकानात धान्य कसे खरेदी करणार हा मोठा प्रश्न निर्माण होऊन समाजात दुफळी माजेल यासाठी राशन दुकानात मांस विक्री करण्याची दिलेली परवानगी रद्द करण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महास्थान विकास मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम ठाकरे,कार्याध्यक्ष सदानंद निमकर,उपाध्यक्ष हुकूमचंद आमदरे,नागपूर जिल्हा महानुभाव मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र आमदरे,महासचिव विजय भरबत तसेच सर्वज्ञ महानुभाव धर्मसेवा प्रतिष्ठानचे रवींद्र टीखे, पंकज ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.