कोरोना आजाराच्या महितीसाठी चंद्रपूरमध्ये प्रश्नमंजुषा; 60 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या मिळणार प्रमाणपत्र - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ मे २०२०

कोरोना आजाराच्या महितीसाठी चंद्रपूरमध्ये प्रश्नमंजुषा; 60 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या मिळणार प्रमाणपत्र

प्रश्नमंजुषा । Talent Search Quiz for all İndir (PC ...
चंद्रपुर/प्रतींनिधी:
जिल्ह्यातील सामान्यातील सामान्य नागरिकांना कोरोना आजार कळावा, कोरोना आजाराची वैशिष्ट्ये, प्रतिबंधात्मक उपाय व नागरिकांच्या मनामध्ये असणारे सर्वसामान्य प्रश्न, उत्तरा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत ऑनलाइन प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा कोरोना नियंत्रण तथा सहाय्यता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर तर्फे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना बाबत विविध जनजागृती अभियान राबवीत आहे. सदरअभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक नागरिकांना कोरोना बद्दल माहिती होणे हा आहे. याचाच एक भाग ऑनलाईन कोरोना जनजागृती-प्रश्नमंजुषा हा आहे. या प्रश्नमंजुषा मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
असे होता येणार सहभागी:
ऑनलाईन प्रश्नमंजुषा फॉर्म आपण मोबाईल, संगणक द्वारे सबमिट करू शकता. सदर प्रश्नमंजुषा मध्ये कोणतीही व्यक्ती भाग घेऊ शकते. प्रश्नमंजुषा मध्ये भाग घेण्याकरिता https://forms.gle/8vGMTDLmKSj8P1qV6 या लिंक वरून कोविड-19 जनजागृती प्रश्नमंजुषा फॉर्म सबमिट करावयाचा आहे. 60 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्यास या कार्यालयाकडून जिल्हाधिकारी चंद्रपूर व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांचे स्वाक्षरीचे ऑनलाईन प्रमाणपत्र आपले ईमेल वर प्राप्त होईल. फॉर्म सबमिट केल्यानंतर लगेचच व्हिव स्कोर मध्ये आपले गुण व आपले ईमेल मध्ये आपण निवडलेल्या प्रश्नाचे उत्तरे पाहू शकता.

प्रश्नमंजुषेची लिंक chanda.nic.in तसेच www.zpchandrapur.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आणि District Corona Control Cell या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.