OBC प्रवर्गास पदभरतीतून वगळल्याप्रकरणी चौकशीचे आदेश;विजय वडेट्टीवार यांनी घेतली डॉ. अंजली साळवे यांच्या निवेदनाची दखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ मे २०२०

OBC प्रवर्गास पदभरतीतून वगळल्याप्रकरणी चौकशीचे आदेश;विजय वडेट्टीवार यांनी घेतली डॉ. अंजली साळवे यांच्या निवेदनाची दखल

चंद्रपूर/प्रतिंनिधी:
राज्याचे बहुजन विकास, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री विजय वडेट्टीवार यांनी डॉ. ऍड. अंजली साळवे यांच्या कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर यांच्या मार्फ़त आवश्यक पदभरतीसाठी दिलेल्या जाहिरातीमध्ये ओबीसी प्रवर्गाला वगळ्ल्याने त्यांच्यावर झालेल्या या अन्यायासंदर्भात संबंधित विभागाला चौकशीचे आदेश देण्याच्या मागणीची दखल घेत प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे खुलासा मागितला आहे.

कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर यांच्या मार्फ़त आयुक्त, आरोग्य सेवा, व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आवश्यक पदभरतीसाठी दिलेल्या जाहिरातीमध्ये संबंधित विभागाच्या पदभरतीमध्ये 48 पदांपैकी ओबीसी प्रवर्गासाठी एकही पद आरक्षित नसल्याने ओबीसी प्रवर्गास या पदभरतीतून वगळण्यात आले आहे व हा ओबीसी प्रवर्गावर अन्याय आहे. यामुळे सदर विभागाने या पदभरतीमध्ये ओबीसी प्रवर्गाला का वगळले आणि ओबीसी प्रवर्गाची भरती याआधी केली असेल तर त्याबाबतची ओबीसी आरक्षणाचा उल्लेख असलेली जाहीरात प्रकाशित झाली होती का?

 यासंदर्भात उच्च स्तरावरून संबंधित विभागाला चौकशीचे आदेश देऊन, योग्य तो खुलासा मागवावा सोबतच याप्रकरणी दोषी आढ़ळणा-यांवर नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करावी. याशिवाय वर्तमान जाहीरात रद्द करून बिंदू नामावलीच्या आधारे इतर प्रवर्गाच्या आरक्षणासोबत ओबीसी आरक्षणाचा समावेश असलेली जाहीरात नव्याने दुरुस्तीसह प्रकाशित करण्याची मागणी डॉ. ऍड. अंजली साळवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री उद्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. श्री अजितदादा पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री ना. श्री राजेश टोपे अणि बहुजन विकास, मदत व पुनर्वसन तथा पालकमंत्री, चंद्रपूर ना. श्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली होती. 

या तक्रारीची तातडीने दखल घेत राज्याचे बहुजन विकास, मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री विजय वडेट्टीवार यांनी प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे याबाबत खुलासा मागविला असुन शासनाचे बिन्दु नामावलीचे जुने परिपत्रक रद्द झाले असतांना व शासनाने कोणतेही सुधारित बिन्दु नामावलीचे परिपत्रक निगर्मित केले

 नसतांना कशाच्या आधारे आरोग्य विभागाने आरक्षण ठरविले आहे याचा बोध होत नसल्याने या भरती प्रक्रियेस स्थगिती द्यावी अश्या सुचना ना. श्री वडेट्टीवार यांनी प्रधान सचिव, आरोग्य विभाग यांना पाठविलेल्या पत्रात केल्या आहे. राज्याचे बहुजन विकास, मदत व पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री विजय वडेट्टीवार यांनी याविषयावर चर्चा करून आपल्या तक्रारीची त्वरीत दखल घेतल्याने सर्वसामान्य ओबीसीसोबतच इतर प्रवर्गांनाही निश्चितच न्याय मिळेल अशी आशा डॉ. ऍड. साळवे यांनी व्यक्त करीत ना. विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले.