मातृदिनी मिळाला गरिबांना सकस आहार सार्वजनीक शिवमंदीर ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ मे २०२०

मातृदिनी मिळाला गरिबांना सकस आहार सार्वजनीक शिवमंदीर ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम


नागपूर /अरूण कराळे (खबरबात) 
आई लेकराची माय असते . वासराची गाय असते . दुधाची साय असते . लंगड्याचा पाय असते. धरणीची ठाय असते . आई असते जन्माची शिदोरी ,सरतही नाही ,उरतही नाही एवढी महिमा आईची गायली जाते .याच आईच्या पूण्यकर्माची थोरवी गाण्यासाठी दरवर्षी १० मे हा मदर्स डे म्हणून साजरा केला जातो . 

याच दिवसाचे औचित्य साधत वाडी येथील मंगलधाम सोसायटी मधील सार्वजनिक शिवमंदीर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ट्रस्टचे अध्यक्ष कमल कनोजे यांच्या नेतृत्वात ज्यांच्या घरच्या चुली पेटण्यासाठी धान्य व किराणा नाही अशा ५०० नागरीकांची यादी तयार करुन मातृदीनी आमदार समीर मेघे यांच्या हस्ते सार्वजानिक शिवमंदीर ट्रस्टचे अध्यक्ष कमल कनोजे ,माजी उपनगराध्यक्ष नरेश चरडे ,नगरसेवक केशव बांदरे ,राकेश मिश्रा ,राजेश जिरापूरे ,मनीष गाडे , जितेंद्र रहागडाले ,चंद्रशेखर देशभ्रतार ,बापू लिमकर, विक्रम तिजारे,देवराव खाटीक, समीर मसने,सुरेश विलोणकर ,नितीन अन्नपूर्णे , राकेश शिवणकर ,नितीन सावरकर ,गजेंद्र देवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्या सर्वच गरीब कुटुंबीयांना अन्नधान्य व किराणाची किट देण्यात आली .

संपूर्ण देशात कोरोनामुळे पारीस्थिती भयावह झाली आहे. लॉकडाऊन वाढतच असल्याने रोजगारावरही गदा आलेली आहे या स्थितीत स्वतः जगायचे कसे आणि कुटुंबीयांना जगवायचे कसे हाही प्रश्न कित्येकांचा रक्तदाब वाढविणारा ठरला याच गोष्टी रोज पाहणाऱ्या सार्वजानिक शिवमंदीर ट्रस्टच्या पदाधिका-यांना समजताच मातृदिनाचे औचित्य साधन गरीब गरजवंत कुटूंबाचा शोध घेत ५०० गरजवंताना शिवमंदीर टेकडीवर अन्नधान्याचे वितरण केले .

J


यात तांदुळ ,आटा ,सोयबीन वडी ,तेल ,साखर ,चणादाळ आदीचा समावेश होता . यावेळी राजेंद्र बिसेन ,अनिल घागरे ,राकेश चौधरी ,सतिश नांदनकर ,धिरज पिल्ले ,डॉ. प्रशांत मालेवार ,देवराव निकम ,महेश कारेमोरे ,अरूणसिंह ,ताराचंद बागडे , वसंतराव गडीनकर ,चंदू वैद्य ,राजू विश्वकर्मा ,कैलास अडले ,प्रवीण राऊत ,बंटी मेहरकुळे ,नरेंद्र नानोटकर ,मनोज बांते ,शिवनारायण शर्मा ,नाना चोपडा ,जितू राऊत ,बापू राजूरकर ,कैलास अडले किशोर ठाकरे ,ज्ञानेश्वर चोपडे उपस्थित राहून या कार्यात मौल्यवान असेच सहकार्य केले .