पोलिसांना आयुर्वेदिक औषधाचे वाटप कोरोना संक्रमणास ३ दिवसांचा डोज - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मे २०२०

पोलिसांना आयुर्वेदिक औषधाचे वाटप कोरोना संक्रमणास ३ दिवसांचा डोज

नागपूर : अरूण कराळे 
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.त्यासाठी डॉक्टर,पोलिस,स्वच्छता कर्मचारी,पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून जनजागृती करीत आहे. पोलिस रस्त्यावर येऊन सतत संरक्षण देत असून कोरोनाचा नायनाट करण्यासाठी नागरिकांनीही आपले कर्तव्य समजून सहकार्य करणे अत्यन्त गरजेचे आहे असे मत डॉ. प्रज्ञा मेश्राम यांनी व्यक्त केले.
 वाहतूक शाखा एमआयडीसी येथील पोलीस कर्मचारी व स्थानिक पत्रकारांना आयुर्वेदिक औषधीचे नुकतेच वितरण करण्यात आले.याऔषधीचे बारीक भुकटी पावडर असून नियमित तीन दिवस सेवन केल्यास कोरोना संक्रमण होत नसून लहान मुलांनाही ही औषधी दिल्या जाते.आजपावेतो ९०० लोकांना काढा तयार करून देण्यात आला असल्याची माहिती डॉ. प्रज्ञा मेश्राम यांनी वाडी प्रेस क्लबला दिली.

यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जाधव,सहा पोलीस  निरिक्षक  विनोद गिरी,उपनिरीक्षक किशोर गवई,पोलिस हवालदार बाळू चव्हाण,विनोद सिंग,जयशंकर पांडे,विलास कोकाटे,देवकुमार मिश्रा,रवींद्र गजभिये, सुरेश तेलेवार,मिलिंद कोल्हे,रितू बोरकर,पत्रकार सुनील शेट्टी,समाधान चौरपगार,सौरभ पाटील,विलास माडेकर,विजय खवसे ,सुरेश फलके ,अरूण कराळे  प्रामुख्याने उपस्थित होते.