गरजवंतांना सॅनिटायझरचे मोफत वितरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

गरजवंतांना सॅनिटायझरचे मोफत वितरण


नागपूर  :-  लाईव्ह सेवा संरक्षण ट्रस्ट व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) तर्फे कोरोना पासून बचावासाठी २० लिटर सॅनिटायझरचे मोफत वाटप सेवानिवृत्त माईन अभियंता ए.टी खोब्रागडे व मिलिंद वानखेडे सरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आल्याने सॅनिटाईझरची मागणी वाढली आहे. आपल्या सामाजिक योगदानाच्या श्रुंखलेमध्ये एक पाऊल पुढे टाकत लाईव्ह सेवा सरक्षण ट्रस्ट व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक शिक्षक संघ )नागपूर विभागाने संकटाचा या परिसथितीत गरजवंतांना सॅनीटाईझर चे वाटप केले यापूर्वी रक्तदान शिबीर, किट वाटप सारखे उपक्रम सुरु आहे त्यात शहर संघटक समीर काळे यांना 5 लिटर गजवंताला वाटण्याकरिता दिला यावेळी शहर संघटक समीर काळे व काॅग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष संजय धरममाळी उपस्थित होते. गजवंतामध्ये संजय नाखले , यशवंत लिगाईत सह उपस्थित होते.