नागपूर जि. प. शिक्षकांचे मुख्यमंत्री सहायता निधीला ७२ लाख २० हजार रुपयांची मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ मे २०२०

नागपूर जि. प. शिक्षकांचे मुख्यमंत्री सहायता निधीला ७२ लाख २० हजार रुपयांची मदत

नागपूर / अरूण कराळे ( खबरबात) 
कोविड १९ विषाणू संसर्गाने देशभर हातपाय पसरविले असतांना या आजाराचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.त्यामुळे नागरीकांच्या उपचारात अधीकाधीक सुविधा व्हावी या हेतुने जिल्हा परिषदच्या शिक्षण सभापती भारती अनिल पाटील आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी पुढाकार घेऊन नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक ,शिक्षक यांचे एक दिवसाचे वेतन मिळून जमा झालेल्या ७२ लाख २० हजार रूपयाचा धनादेश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे शुक्रवार २२ मे रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला.

 यावेळी जि. प. अध्यक्ष रश्मी बर्वे ,शिक्षण सभापती भारती पाटील ,मुख्यकार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर ,सभापती उज्वला बोढारे तसेच जि. प. शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .