नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी:नागपुरात १४ मे पासून काही प्रमाणात उठणार लॉकडाऊन:ऑनलाईन मद्यविक्रीला नागपुरातही परवानगी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ मे २०२०

नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी:नागपुरात १४ मे पासून काही प्रमाणात उठणार लॉकडाऊन:ऑनलाईन मद्यविक्रीला नागपुरातही परवानगी

कुठल्याच अनुज्ञप्तींना ऑनलाइन मद्य ...
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश 
 ऑनलाईन मद्यविक्री, कुलर, चष्मे, हार्डवेअर दुकाने सुरू होणार
नागपूर(खबरबात)
 राज्य शासनाने दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून नागपुरात १४ मे पासून ऑनलाईन मद्यविक्रीला नागपुरातही परवानगी देण्यात आली आहे. परंतु यासाठी ग्राहकाजवळ मद्यपरवाना असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यासंदर्भातील नवे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज (ता. १३) जारी केले. त्यानुसार काही दुकाने आळीपाळीने निरनिराळ्या दिवशी सुरू राहतील.

नागपुरात ऑनलाईन मद्यविक्री राज्य शासनाने ११ मे रोजी काढलेल्या आदेशानुसार सुरु होईल. प्रतिबंधित क्षेत्रातून किंवा क्षेत्रात मद्यविक्रीला किंवा मद्य ऑनलाईन पद्धतीने मागविण्यास परवानगी राहणार नाही. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या नव्या आदेशानुसार नागरी क्षेत्रातील बांधकाम जेथे कामगार निवासी राहतील, तेथे बांधकाम सुरू करता येईल. आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार), ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार) अशाप्रकारे सुरू राहतील. ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण), खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत, सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत सुरू करता येतील. याव्यतिरिक्त, मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू करता येतील. प्रतिबंधित क्षेत्रात हा आदेश लागू राहणार नाही. केवळ तेथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत सुरू असतील. प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे ती प्रतिष्ठाने सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरु राहतील. जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, नागरी क्षेत्रातील उद्योग, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही.

मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केल्याप्रमाणे ज्या-ज्या बाबी सुरू करण्यास मुभा दिली आहे, त्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज राहणार नाही. हा आदेश म्हणजेच परवानगी समजण्यात यावे, असेही आदेशात नमूद केले आहे. हे सुरू करताना लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावे लागतील. सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर या गोष्टी बंधनकारक राहतील.

लॉकडाऊनकाळात नागपूरकरांनी दिलेल्या सहकार्यामुळे प्रशासनाला परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले. त्यामुळे लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढेही नागरिकांनी असेच सहकार्य केल्यास लवकरच सर्व सेवा सुरू करता येतील, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.
हे राहणार सुरू
- केवळ परवानगी असणाऱ्या कामासाठी वैयक्तिक गाड्यांचा‌ वापर
- एका कारमध्ये दोन व्यक्ती प्रवास करू शकतील.
- दोन चाकी गाडीवर सहप्रवासी बसण्यास परवानगी नाही.
- आवश्यक सामुग्रीचे उत्पादन जसे औषधी, मेडिकल उपकरणं, त्यासाठी लागणारे साहित्य
- नियमित सुरू ठेवण्याची आवश्यकता असणारे प्रोडक्शन युनिट आणि वितरण व्यवस्था
- आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन
- नागरी क्षेत्रात जेथे बांधकाम स्थळांवरच कामगार उपलब्ध असतील तेथील बांधकाम (प्रतिबंधित परिसर सोडून इतर परिसरातील नवनिर्मिती बांधकामांसाठी वेळोवेळी परवानगी दिली जाईल.
- कोव्हिड-१९ च्या नियमानुसार जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने आणि बाजारसंकुल
- प्रतिबंधित परिसरात फक्त जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजता दरम्यान सुरू राहतील.
- इलेक्ट्रिकल सामुग्रीची दुकाने, कुलर, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार)
- ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार)
- ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार)
- ऑनलाईन मद्यविक्री
- ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण)
- खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत
- सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत)
- मान्सूनपूर्व सर्व कामे
- २० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करता येईल.
हे राहणार बंद
- सर्व देशांतर्गत आणि आंतरदेशीय विमानसेवा (मेडिकल सर्व्हिसेस आणि एअर अँबुलन्स वगळून)
- प्रवासी रेल्वे गाड्या (गृह मंत्रालय आणि राज्य शासनाने परवानगी दिलेल्या गाड्या वगळून)
- आंतरराज्यीय प्रवासी बस वाहतूक (शासनाची परवानगी असलेल्या वगळून)
- मेट्रो रेल्वे सेवा
- सर्व शाळा, महाविद्यालाये, शिकवणी वर्ग (ऑनलाईन वर्गाना परवानगी राहील)
- सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम्नॅशियम, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जलतरण हौद आदी
- सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच गर्दी होणारे सर्व कार्यक्रम
- सर्व धार्मिक स्थळे
- सायकल रिक्षा आणि ऑटो रिक्षा
- टॅक्सी आणि कॅब सेवा
- जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील बससेवा
- सलून आणि स्पा
- सेझ, औद्योगिक वसाहती, निर्यात करणारे उद्योग.