चंद्रपूर जिल्हात येणा-या त्या ६२ पाँईटवरील बंदोबंस्त वाढवा:जोरगेवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ मे २०२०

चंद्रपूर जिल्हात येणा-या त्या ६२ पाँईटवरील बंदोबंस्त वाढवा:जोरगेवार

चेक पोस्टवरील बंदोबस्त वाढवा आमदार किशोर 
जोरगेवार यांच्या पोलिस अधिक्षकांना सुचना
पोलीस विभागाच्या उपाययोजनांचा घेतला आढावा
चंद्रपुर/प्रतींनिधी:
चंद्रपूरात कोरोनाचा रुग्ण नाही त्यामूळे बाहेरुन चंद्रपूरात येणा-यांकडे लक्ष केंद्रीत करुन चंद्रपूर जिल्हात येणा-या ६२ पाँईटवरील बंदोबंस्त वाढवा अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांना दिल्या आहे. काल गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन परिस्थिताचा आढावा घेतला.

कोरोनाच्या पाश्वभुमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. चंद्रपूरकरही संचारबंदीला सहकार्य करत आहे. आज घडीला चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉजीटीव्ह रुग्ण नाही. त्यामूळे आता बाहेरुन येणा-यांकडूनच चंद्रपूकरांना अधिक धोका आहे. अशात पोलिस प्रशासनाने बाहेर राज्यासह बाहेर जिल्ह्यातून चंद्रपूरात दाखल होणा-या ६२ पाँईटवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन चेक पोस्टला भेट दिली होती.

 या दरम्यान येथील ढिसाळ नियोजनावर आमदार किशोर जोरगेवार यांनी चांगलीच नाराजगी व्यक्त केली होती. त्यांनतर आता आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेत त्यांना चेक पोस्टवरील वस्तूस्थितीची माहिती दिली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षकांकडून संचारबंदीच्या काळातील पोलिस विभागाच्या उपायोजांना आढावाही घेतला. यावेळी अत्यावश्यक वस्तू घेऊन येणा-या वाहनचालकांची व वाहकांची तपासणी करूनच त्याला चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा, बाहेर राज्यातून, जिल्ह्यातून अत्यावश्यक सामान घेऊन इतर जिल्ह्यात जाणारे वाहन तपासून त्यांना समोर जाण्यास परवानगी देण्यात यावी, जिल्ह्याच्या सभोवताल कोळश्याच्या खाणी असल्याने जिल्ह्यातून कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे त्यांच्या वाहनचालकाची, वाहकाची आरोग्य तपासणी करण्यात यावी, त्यांना ओळखपत्र देण्यात यावे, संपूर्ण वाहनांची चेक पोस्ट वर नोंदणी करून माहिती ठेवण्यात यावी तसेच त्या संपूर्ण चालना-या वाहनांना रीतसर परवानगी दिली गेली कि नाही हे तपासूनच समोर जाण्यास परवानगी देण्यात यावी.

चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करण्याकरिता ६२ पाईंट असून त्या - त्या परिसरातील संपूर्ण पोलीस निरीक्षक, आरोग्य विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना नियमित कर्तव्यावर ठेवण्यात यावे, चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करणा-या ६२ पाईंटवर पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभागाचे कर्मचारी हे कमी प्रमाणात कार्यरत असल्याने त्यांना प्रत्येकाची तपासणी करण्याकरिता अडचण निर्माण होत आहे त्या करिता ताबडतोब कोरोणा विषाणु तपासणी चेक पोस्टवर अतिरिक्त कर्मचा-यांची नेमणूक करण्यात यावी. अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांना दिल्या आहेत.