कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर जेवणात चिकन आणि अंडीचा जास्त वापर करावा लागेल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मे २०२०

कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर जेवणात चिकन आणि अंडीचा जास्त वापर करावा लागेल

पहिले अंडे की पहिली कोंबडी? याचे ...
कोरोना विषाणूपासून चिकन व अंडी सुरक्षित
मानवी आहारात वापर करायाचे आवाहन
चंद्रपूर(खबरबात):
कुक्कूट मांस व अंडी प्रथिनाचे उत्तम व स्वस्त स्त्रोत असून कुक्कूट उत्पादने मानवी आहारात वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत. कुक्कूट मांस व अंडी यांच्या सेवनामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होत नाही. नागरिकांनी आहारात याचा वापर करावा,असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.

आयुक्त पशुसंवर्धन, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी कुक्कूट पक्षांपासून नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रसार होत नसल्याबाबत स्पष्ट केलेले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी देखील अंडी व कुक्कूट मांस यामधून नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रसार होत नसून त्यांचे सेवन पूर्णपणे सुरक्षित असल्याबाबत प्रसिद्धीपत्रक निर्गमित केलेले आहे.
 महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा, रोग अन्वेषण विभाग,औंध पुणे यांनी काढलेल्या परिपत्रकात कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने मानवी आहारामध्ये वापरण्याची पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे व याबाबत काही शंका असल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा असे स्पष्ट केलेले आहे.

महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन व्यवसायांमध्ये देशात अग्रेसर आहे. सन 2019 च्या 20 व्या पशुगणनेनुसार राज्यामध्ये एकुण कुक्कुट संख्या 7 कोटी 42 लाख इतकी आहे.
कुक्कूट पक्षांमध्ये होणारे विविध रोग व त्यांचे नियंत्रण हा व्यवसायामधील यशस्वी होणेसाठीचा सर्वांत महत्वाचा मूलमंत्र आहे. चीन या देशामध्ये आलेल्या नोव्हेल कोरोना विषाणू प्रार्दुभावाच्या अनुषगांने गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर (सोशल मिडीया - फेसबूक व व्हॉट्सअपद्वारे ) आपल्या देशात व राज्यात कुक्कुट मांस व इतर कुक्कूट उत्पादने यांच्या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्त्रीय अफवा पसरविल्या जात आहेत.

राज्यातील कुक्कुट पालन व्यवसायाशी लाखो शेतकरी यांचे चरितार्थ व हित निगडीत आहेत. मका व सोयाबीन उत्पादक शेतकरी विशेषतः कुक्कूट पालन उद्योगाशी संलग्न आहेत. तसेच कुक्कूट व्यवसाय राज्याच्या विकासाशी जोडलेला आहे.कुक्कूट पक्षी व कुक्कूट उत्पादने यांचा नोव्हेल कोरोना विषाणू प्रार्दुभावाशी कोणताही संबध नाही.
नोव्हेल कोरोना विषाणू हा सांसर्गिक असुन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस संक्रमीत होतो. तथापी कुक्कूट पक्षांमधील कोरोना विषाणू (इन्फेक्शीअस ब्राँकायटीस) मानवामध्ये संक्रमित होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत.

कुक्कूट मांस व कुक्कूट उत्पादने यांच्या सेवनामुळे मानवामध्ये नोव्हेल कोरोना विषाणू संक्रमीत झाल्याचे संदर्भ नाहीत. आपल्याकडे चिकन व मटण उकळून शिजवून सेवन केले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत, तरी ग्राहकांनी सोशल मिडीया - फेसबुक व व्हॉट्सअप इत्यादी माध्यमातील विपर्यास केलेल्या माहिती, बातम्या,अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्या कडील कुक्कूट मांस व कुक्कूट उत्पादने यांचा नोव्हेल कोरोना विषाणूशी संबंध नाही व ती आहारात वापरण्यासाठी पुर्णतः सुरक्षीत आहेत.
सर्वात चांगले पोल्ट्रीफिड सध्या Nutrikraft पोल्ट्रीफिड कंपनीचे आहे.कमी दिवसात जास्त वजन देणारे फिड सध्या बाजारात उपलब्ध आहे. फिडच्या संपर्कासाठी सर्व 9175937925 या संपर्क क्रमांकावर फोन करुण आपले फिड आजच बुक करू शकता.