लॉकडाऊनमध्ये चंद्रपूर शहरात अस्वलीचा मुक्त संचार रात्रभर फिरली अस्वल शहरात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ मे २०२०

लॉकडाऊनमध्ये चंद्रपूर शहरात अस्वलीचा मुक्त संचार रात्रभर फिरली अस्वल शहरात

ललित लांजेवार/चंद्रपूर:
लॉकडाऊन सुरू असतांना रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. अशातच चंद्रपूर शहरात अचानक रात्रीच्या सुमारास अस्वल फिरायला लागली. अस्वल प्रथम रात्री 12.30 वाजता जटपुरा गेट चंद्रपूरचा राजा गणेश मूर्ती स्थापना स्थळ परिसरात दिसली.

आणि हा प्रवास सकाळपर्यंत बंगाली कॅम्प असा सुरू होता,सकाळी 7 वाजता या अस्वलीला वनविभाग आणि इको-प्रोच्या माध्यमातून जेरबंद करण्यात आले.
याआधी देखील चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी चौक परिसर तसेच रामनगर परिसर इरई नदी दाताळा रोड परिसरात अस्वल फिरतांना दिसून आलेली आहे