डिफेन्स फेडरेशनचा केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावर बंदी घालण्यास विरोध - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

डिफेन्स फेडरेशनचा केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावर बंदी घालण्यास विरोध

नागपूर:अरूण कराळे:
ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावर बंदी घालण्यास विरोध केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६१ लाख निवृत्तीवेतनधारकांना या आपत्तीच्या वेळी आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. सरकारी कर्मचारी कोरोना विषाणूच्या आपत्तीत थेट आणि अप्रत्यक्षपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. 

 ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष एस.एन. पाठक आणि राष्ट्रीय सरचिटणीस सी. कुमार यांनी राष्ट्रीय पातळीवरील सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर महागाई भत्त्यावरील बंदीला विरोध दर्शविणारा ठराव संमत केला आहे. केंद्र सरकारनी हा निर्णय मागे घेण्याची विनंती निवेदनाद्वारे केली आहे राष्ट्रीय स्तरावरील जेसीएम कौन्सिल सेक्रेटरी यांनी या विषयावर हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. यावेळी भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघचे संरक्षक तसेच भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष अॅड श्रीराम बाटवे,सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव पी. के. मोहनन ,भामसंचे माजी राष्ट्रीय संगठन मंत्री मुकुंद रंगदळे , सचिव आर.पी.चवरे, हर्षल ठोंबरे, आयुध निर्माणी मजदूर संघचे अध्यक्ष एम.एम.व्यास, महामंत्री सचिन डाबरे, जे. सी.एम. सदस्य ब्रिजेश सिंह, संजय वानखेडे, बंडु तिडके, ओ.पी.उपाध्याय उपस्थित होते.