बहिणीला भेटायला गेलेल्या भावाचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मे २०२०

बहिणीला भेटायला गेलेल्या भावाचा मृत्यू

चांपा/प्रतिनिधी:
बहिणीला भेटायला आलेल्या भावाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला . ही दुर्दैवी घटना कुही तालुक्यातील लांजाळा गावानजीकच्या शेतात शेतात घडली . खिमजी वेरशी खामलया ( वय ३८ , रा . पद्धर , ता . बुच , जि .कच्छ गुजरात )असे मृत भावाचे नाव आहे .

मृत खिमजी खामलया हे भावासह ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करीत होते . अहमदाबाद येथे औषधे न्यायची असल्याने ते बुधवारी टाटा वाहनाने नागपूरला आले होते .बहीण सजीबेल विसाभाई रबारी ह्या कुही तालुक्यातील लांजाळा गावनजीकच्या शेतात मेंढीपाळांच्या बेड्यावर असल्याचे माहीत होताच दोघे भाऊ भेटण्यास आले.व रात्री बेडयावरच झोपले .

रात्री दीडच्या सुमारास अचानक वादळवारा व विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली .दरम्यान अंगावर वीज पडल्याने खुल्या आभाळाखाली झोपलेले खिमजी वेरशी खामलया यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला . 

फिर्यादी नागझी वेरशी खामलया यांच्या तक्रारीवरून कही पोलिसांनी घटनेची नोंद केली . पोलीस निरीक्षक पंजाबराव परघने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के , हवालदार दिलीप लांजेवार , पवन सावरकर , पंकज बुटले पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली .