करंट लागल्याने शेतात काम करणाऱ्या (सालदाराचा) मृत्यू:कारंजा तालुक्यातील एकांबा येथील घटना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मे २०२०

करंट लागल्याने शेतात काम करणाऱ्या (सालदाराचा) मृत्यू:कारंजा तालुक्यातील एकांबा येथील घटना

प्रतिनिधी/कारंजा (घाडगे):
आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान विनोद पाटील यांच्या शेतातील सालदार रवींद्र गजाम वय ४२ वर्ष  झाडावर चढून झाडाच्या फांद्या तोडतांना झाडाला लागूनच विजेची मोठी लाईन गेली आहे फांदी तोडता तोडता फांदीचे एक टोक विजेच्या तारांवर पडलं आणि दुसरे टोक रवींद्रच्या अंगावर पडताच रवींद्र करंटने जागीच ठार झाला. त्याचे पूर्ण शरीर काळे पडले  .
 घटनेची माहिती तळेगाव पोलिसांना देण्यात आली. १२ वाजताच्या दरम्यान पंचनामा करून शवविच्छेदन साठी मृतकाचा मृतदेह कारंजा ग्रामीण रुग्णालयात आणला.
मृतक रवींद्र गजाम याला पत्नी व २ मुले आहे.घरची परिस्थिती फार हलकाईची आहे अशातच घरचा कर्ता गेल्यामुळे कुटूंबावर फार मोठी आपत्ती ओढावली आहे.मृतकाच्या पत्नीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे.