कोविड १९ चा लढा एकत्र मिळून लढू या:मंत्री सुनील केदार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

कोविड १९ चा लढा एकत्र मिळून लढू या:मंत्री सुनील केदार


◆वाडीत शाळा संचालक राजेश जयस्वाल यांचा माणुसकीला जोपणारा उपक्रम
◆वडीलांच्या पुण्यतिथी निमीत्य गरजवंताना मदत
नागपूर/अरूण कराळे (खबरबात)

राज्यात कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे सतत लॉकडाऊन वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. महाराष्ट्र शासनाने आपली जबाबदारी स्विकारली असली तरी आपणही तेवढीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक गरज असल्यास तेंव्हाच घराबाहेर पडावे. घरी राहूनच सुरक्षित राहता येईल. आलेल्या संकटाने खचून न जाता आपण एकत्र येऊन कोविड १९ चा लढा लढवू या.असे आव्हान यावेळी कॅबीनेट मंत्री सुनील केदार यांनी केले.

वाडी शहरामध्ये वास्तव्य करणारा स्थानिक नागरिक बहुतांश मोठ्या संख्येने सर्वसामान्य,मागासवर्गीय व दैनंदिन रोजमजुरीचे काम करणारा कामगार वर्ग आहे. सतत वाढत असलेल्या संचारबंदीमुळे तो हवालदिल होऊन त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत असताना श्री विश्वनाथ बाबा हायस्कुल व स्व. मातादिन जयस्वाल शाळेचे संचालक नगरसेवक राजेश जयस्वाल यांनी मातादिन जयस्वाल यांच्या ३१ व्या पुण्यतिथी निमित्त संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या व टेकडी वाडी,आंबेडकर नगर व कंट्रोल वाडी येथील गरजूं,दिव्यांगाच्या मदतीला धावून एक हजार लोकांना राज्याचे पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदार,माजी मंत्री रमेश बंग ,नगराध्यक्ष प्रेम झाडे यांचे हस्ते तसेच माजी सरपंच अशोक माने,उपनगराध्यक्ष राजेश थोराने,संचालक श्यामकुमार जयस्वाल,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे,नगरसेवक नरेंद्र मेंढे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम मंडपे,वसंतराव इखनकर,शैलेश थोराने,सतिश जिंदल,प्रा. सुरेंद्र मोरे,नरेश बारई,दिलीप दोरखंडे,प्रकाश कोकाटे,अश्विन बैस,डॉ. गुलाब बिडवाईक,प्राचार्य अनिता टोहरे,महेश बंग,गौरव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ४५० विद्यार्थ्यांचे पालक व ५५० गरजवंताना जीवनाश्यक वस्तूचे वाटप करीत वडीलांची पुण्यतिथी साजरी केली.

शासकीय नियमाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेत शारीरिक अंतर व सॅनिटायझर चा वापर करून काटेकोरपणे पालन करण्यात आले.यावेळी दत्ताजी वानखेडे,योगेश चरडे,राजू खोब्रागडे, विजय नंदागवळी,प्रशांत कोरपे,दिनेश उईके,जुगलकिशोर जयस्वाल,गोपाल राठी,गणपत रागीट,माणिक गोमकार,सुनील सिंग,बंडू जयस्वाल,राजेश बिडवाईक,संदीप उपासे प्रामुख्याने उपस्थित राहून सहकार्य केले.