चंद्रपुरात मुंबई-पुणे येथून परतणाऱ्या नागरिकांनी शकुंतला लॉनवर प्राथमिक तपासणी करावी :आयुक्त राजेश मोहिते - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

चंद्रपुरात मुंबई-पुणे येथून परतणाऱ्या नागरिकांनी शकुंतला लॉनवर प्राथमिक तपासणी करावी :आयुक्त राजेश मोहिते


प्रत्येक तालुक्याला बसस्थानकावर व गावात आशा वर्कर मार्फत तपासणी
 चंद्रपूरमध्ये आतापर्यंत 1 हजारावर नागरिकांची आरोग्य तपासणी
चंद्रपूर(खबरबात):
 चंद्रपूर शहरात मुंबई-पुणे व अन्य शहरातून आगमन होत असलेल्या नागरिकांनी आपली सर्व प्रथम तपासणी व नोंद शकुंतला लॉन येथे करावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यात अन्य शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी संबंधित तालुक्याच्या बसस्थानकावर होत आहे तर गावपातळीवर आशा वर्कर कडून ही तपासणी होत आहे याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लॉकडाऊन मध्ये शिथिलता जारी केल्यानंतर प्रत्येकाने आपल्या शहराकडे गावाकडे धाव घेतली आहे. मात्र गावाकडे शहराकडे व आपल्या तालुक्याकडे येणाऱ्या नागरिकांवर आता आपल्या परिसराच्या आरोग्याची व स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी आली आहे. या सर्वांनी ज्या परिसरातील नागरिकांच्या व कुटुंबाच्या भल्यासाठी आरोग्याची प्राथमिक तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान चंद्रपूर येथे महानगरपालिका व जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत शकुंतला लॉन येथे बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या थर्मल स्क्रीनिंग व अन्य आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी आली आहे. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका मोठ्या हिमतीने दिवस-रात्र काम करीत आहेत.

देशात लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई, पुणे व इतर महानगरात किंबहुना इतर राज्यांत नोकरीसाठी, कामासाठी गेलेले हजारो नागरिक आपल्या गावी परतले आहे. त्यामुळे त्यांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या यंत्रणेवर मोठा ताण आला आहे, मात्र कुठलाही ताण न घेता नागरिकांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे, असे समजूनच आरोग्य विभागाचे कर्मचारी जोमाने कामाला लागलेले आहेत.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, सफाई विभागाचे कर्मचारी, शिक्षक कर्मचारी तसेच बाहेर गावांहून परतलेल्या नागरिकांची तपासणी करण्याचे काम करीत असून जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 550 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यासोबतच त्यांना घरातच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जिल्ह्यात विविध शहरांतून दाखल झालेल्या नागरिकांची प्राथमिक तपासणी जिल्हा परिषद आरोग्य विभाग, चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणेमार्फत केली जात आहे. सध्या 2 वैद्यकीय अधिकारी, 2 परिचारिका, 1 आरोग्य सेविका, 15 शिक्षक कर्मचारी, तपासणीची कामे करीत आहेत. तर 4 सफाई विभागाचे कर्मचारी साफसफाईचे काम करीत आहेत. त्यासोबतच जिल्ह्यात परराज्यातून व बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची वारंवार माहिती घेतली जात आहे.

जिल्ह्यातील नागपूर रोडवरील शकुंतला लॅान येथे परराज्यातून व परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. नुसतीच तपासणी न करता तपासणी झालेल्या नागरिकांची दररोज माहिती घेण्यात येत असून, सर्व नागरिकांना कोरोना या आजाराजी माहिती देऊन घरातच राहण्याचा सल्ला वारंवार देण्यात येत आहे.
अशी होते प्रक्रिया
परराज्यातून व परजिल्ह्यातून आलेल्या सर्व व्यक्तींची आरोग्य तपासणीसाठी जिल्हा आरोग्य विभाग व महानगरपालिका आरोग्य विभाग पथक सज्ज असून सर्वप्रथम आलेल्या नागरिकांची नोंदणी करण्यात येत असून वैयक्तिक माहिती भरून घेतल्या जात आहे. थर्मल स्क्रीनिंगद्वारे वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांचे समुपदेशन करून त्यांना होम क्वॉरेन्टाइनचा शिक्का मारून त्यांना 14 दिवसांकरिता होम क्वॉरेन्टाइन करण्यात येत आहे.
कोरोना : क्वारंटाईन सेंटरला हॉटेलचा पर्याय
 मात्र नागरिकांनी स्वतः करावा खर्च
चंद्रपूर(खबरबात):
 कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने शहरात अलगीकरण केंद्र (क्वारंटाईन सेंटर) बनविले आहेत. या केंद्रांमध्ये योग्य त्या सुविधा मनपातर्फे पुरविल्या जात आहेत, मात्र काही नागरिकांद्वारे अतिरिक्त व उच्च दर्जाच्या सेवांची मागणी केली जाते, अशा नागरिकांसाठी हॉटेलमध्ये राहण्याचा पर्याय आता मनपा प्रशासनाने दिला आहे. मात्र तो सर्व खर्च ज्यांना उच्च दर्जाच्या सुविधा पाहिजे अशा नागरिकांना स्वतः करावा लागणार आहे. 

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत शहरात महानगरपालिका स्तरावर २ कोव्हीड केअर सेंटर, १० इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन सेंटर तयार केले आहे तसेच शकुंतला लॉन येथे रेड झोन, ऑरेंज झोन, परजिल्हा, परराज्यातून येणाऱ्या नागरीकांची स्क्रिनींग करून होम वा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केले जात आहे. 

वन अकॅडमी इमारत १ व २ येथे कोव्हीड केअर सेंटर तर वसंत भवन, समाज कल्याण केंद्र , गर्ल्स हॉस्टेल इमारत १ व २, चेमरी गेस्ट हाऊस, तलाठी प्रशिक्षण केंद्र, गव्हर्मेंट इंजिनीरिंग कॉलेज बॉईज व गर्ल्स, पीडब्लूडी क्वार्टर्स , एचव्हीडीसी विश्राम गृह येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन सेंटर महानगरपालिकेद्वारे तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी महानगरपालिकेने जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेले बहुसंख्य व्यक्ती त्याला चांगला प्रतिसाद देखील देत आहेत. सध्या रुग्णाची संख्या १२० च्या आसपास असून क्वांरंटाईन व कोव्हीड केअर सेंटरमध्ये ठेवलेल्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Cartoon Hotel PNG and Cartoon Hotel Transparent Clipart Free ...
आता मात्र या सेंटर मध्ये आर्थिकदृष्ट्या सबल व उच्च राहणीमान असलेल्या काही नागरीकांना उच्च दर्जाच्या सुविधा अपेक्षित आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी मनपा आयुक्तांनी शहरातील काही हॉटेलमालकांशी चर्चा करून सदर व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आहे. यात एनडी हॉटेल, लोटस हॉटेल, ट्रायस्टार हॉटेल, साईदर्पण हॉटेल येथे उच्च दर्जाच्या सुविधा इच्छुक नागरीकांना स्वखर्चाने क्वारंटाईन होता येणार आहे. मात्र हॉटेलचा खर्च त्या रुग्णाने स्वतः करायचा आहे तसेच क्वारंटाईन काळातील नियमांचे पालन त्यांना करावे लागणार असून संबंधित हॉटेललाही प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.