चंद्रपूर:मणिकगड (गडचांदुर) येथुन ताब्यात घेतलेल्या 3 कोरोना संशयित रुग्ण घेऊन नांदेड पोलीस रवाना:चंद्रपूर जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेची होऊ शकते दमछाक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

चंद्रपूर:मणिकगड (गडचांदुर) येथुन ताब्यात घेतलेल्या 3 कोरोना संशयित रुग्ण घेऊन नांदेड पोलीस रवाना:चंद्रपूर जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेची होऊ शकते दमछाक


खबरबात/चंद्रपूर:
दिनांक ०६मे २०२० रोजी रात्री दरम्यान माणिकगड (गडचांदुर) जिल्हा चंद्रपुर येथे नांदेड येथुन आलेल्या तिन नागरीकांना संशयावरुन जिल्हा प्रशासन व पोलीसांचे मदतीने ताब्यात घेतले होते. पोलीस व कोव्हीड १९ नियंत्रण कक्ष प्रशासनाच्या वतीने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीसांसोबत सपंर्क केला असता चंद्रपुर येथील ताब्यात घेतलेले तिन इसमांचे नाव ही नांदेड येथुन पसार झालेल्या इसमांसोबत मिळते जुळते नसल्याची माहीती मिळाली. 

 तरीही पुढील खबरदारी म्हणुन नांदेड येथील पथक हे अम्बुलन्ससह चंद्रपुर येथे येवुन, माणिकगड येथुन ताब्यात घेतलेल्या या  तिनही नागरीकांना घेवुन पुढील तपासणी व पडताळणीकामी नांदेड येथे रवाना झाले आहेत.

विशेष म्हणजे नियमानुसार कोरोना बाधित रुग्ण ज्या जिल्ह्यात सापडले त्या जिल्ह्यात त्यांची तपासणी केल्या गेली पाहिजे असा नियम आहे मात्र चंद्रपूर जिल्हा प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी या तीनही व्यक्तींची कोणती तपासणी केली यासंदर्भात आम्ही आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क होऊ शकला नाही.   

एकीकडे देशात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रत्येकाला कोरोना किंवा फ्लू सदृश्य आजार नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असतांना जर त्यांची कोरोना संबंधित कोणतीही वैद्यकीय तपासणी केली नसेल व या तिघांना नांदेडला रवाना केले असेल तर मात्र हे चंद्रपूर जिल्ह्याप्रशासनाला  पुढे डोकेदुखी ठरू शकते.

जर नांदेड ला गेल्यावर पुढील 15 दिवसांत हे बाधित असल्याचे लक्षात आले तर चंद्रपूर प्रशासन या रुग्णांच्या संपर्कात आलेलय व्यक्तीची  

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसे करणार? हा प्रश्न आहे. जर हे संशयित रुग्ण चंद्रपुर जिल्ह्यातील इतर ठिकाणी भटकले असतील तर मात्र कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये चंद्रपूर पोलिसांना व चंद्रपूर जिल्हा प्रशासन आरोग्य यंत्रणेला चांगली दमछाक होणार आहे. 

 सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. सध्या काही माध्यमातून ब्रेकिंग च्या नादात बातम्यांची शहानिशा न करता बातम्या प्रकाशित करण्यात येत आहे. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम व भिती निर्माण होईल अशाप्रकारे संदेश किंवा माहीती खात्री झाल्याशिवाय सोशल मिडीयावर प्रसारीत करु नये अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर यांनी दिली आहे