चंद्रपूरच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मुलाचा व ईतर संशयितांचा अहवाल निगेटिव्ह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ मे २०२०

चंद्रपूरच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मुलाचा व ईतर संशयितांचा अहवाल निगेटिव्ह

पवन झबाडे/ख़बरबात
चंद्रपूरातील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णाच्या पत्नी आणि मुलीचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आता त्याचा मुलाचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे त्याच सोबत परिसरातील संबंधित 44  रुग्णांपैकी 24 रुग्णांचा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे.

या रुग्णाला कोविड शिवाय अन्य आजाराच्या विशेष तपासणी करीता सायंकाळी नागपूरला हलविण्यात आले आहे.

गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ कोरोना निगेटिव्ह असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शानिवारी सायंकाळी 8:30 वाजता एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला होता. 

चंद्रपूर महानगरातील बंगाली कॅम्प परिसरात असणाऱ्या क्रिष्णा नगर भागाला पूर्णतः बंद करण्यात आले. 

चंद्रपूरमध्ये केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह आहे. जिल्ह्यांमधील लॉकडाऊन कायम असून जीवनावश्यक वस्तू वगळता कोणत्याही नव्या दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सकाळी 9 वाजता विजयवाडा येथून आंध्र आणि तेलंगाना राज्यात अडकलेल्या 1 हजारावर मजुरांना चंद्रपूर येथे  विशेष ट्रेनने आणण्यात आले. या सर्व मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्यात आले असून त्यांना होम कॉरन्टाइन करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या एकच पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण आहे. या रुग्णाच्या सानिध्यात आलेल्या कुटुंबातील सदस्य तसेच परिसरातील अन्य व्यक्ती व हा रुग्ण काम करत असलेल्या अपार्टमेंटमधील यापुर्वीच पाठविण्यात आलेल्या एकत्रित 44 पैकी 24 नागरीकांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आहे. यामध्येच रुग्णाच्या मुलाचा देखील अहवाल निगेटीव्ह आहे. अन्य 7 अहवाल यापुर्वीच निगेटिव्ह आले असून यामध्ये  2 अहवाल हे रुग्णाच्या पत्नी व मुलीचे आहे.दरम्यान,आज आणखी परीसरातील चौकशीमध्ये रुग्णाच्या संपर्कातील आतापर्यंतच्या 71 लोकांची यादी तयार करण्यात आली आहे.

दरम्यान, बिहार येथील मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी उद्या वर्धा आणि नागपूर या ठिकाणावरून 2 वेगवेगळ्या रेल्वे गाड्या सुटणार आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही ठिकाणच्या रेल्वे साठी 15 ही तालुक्यातील मजुरांच्या याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून उद्या त्यांना वर्धा व नागपूर येथे हे संबंधित रेल्वे गाड्यांवर पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांची वाहन व्यवस्था करण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज लॉकडाऊन संदर्भात बोलताना या पूर्वीप्रमाणेच जीवनावश्यक वस्तूंशिवाय कोणतीही दुकाने उघडली जाऊ नये, असे पुन्हा स्पष्ट केले. याशिवाय सोशल माध्यमांवर विनाकारण अफवा पसरविणाऱ्यावर, समाजजीवन ढवळून काढणाऱ्या चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहे.
www.khabarbat.in