चंद्रपूर:wcl कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

चंद्रपूर:wcl कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

चंद्रपूर(खबरबात):
चंद्रपूर येथील लालपेठ खाणीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा खाण परिसरातच कंपनीच्याच ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. 

विनोद शिरभैये (५९)वर्षे असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.मृतक सकाळी हजरी लावून आपल्या कामावर निघाले होते, ते आपल्या दुचाकीने जात असतांना परिसरात कामानिमित्य निघालेल्या कंपनीचा ट्रक क्रमांक एम.एच.३४.ए.४३६२ च्या मागच्या चाकात दुचाकी आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 
     
येत्या नोव्हेंबर महिन्यात मृतक WCL च्या सेवेतून निवृत्त होणार होते.ते  शहरातील भिवापूर वार्ड परिसरात राहतात.  या अपघाताबाबत विविध चर्चा असून अपघात कसा घडला याची चौकशी सध्या शहर पोलीस करीत आहे.अपघातानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हासामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.