चंद्रपूर:२५ हजार लाच घेतांना तलाठ्याला रंगेहात अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

चंद्रपूर:२५ हजार लाच घेतांना तलाठ्याला रंगेहात अटक

Tourist driver arrested for using ACB symbol to evade toll, fines ...
चंद्रपूर/(खबरबात):
राजेद्र विठोबाजी अतकरे, तलाठी, कार्यालय साजा क्र ४ खेड मक्ता ता.ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर  यांना लाचेच्या सापळयात ACB कडून  रंगेहात अटक करण्यात आली.

तक्रारदार हे मौजा ब्रम्हपुरी ता. ब्रम्हपुरी येथील रहिवासी असून तक्रारदार यांचे खेड मक्ता येथील०.४३ हे.आर जमीनीवर पडलेल्या प्लॉटीगच्या कामासाठी व फेरफारसाठी अतकरे, तलाठी,यांनी ३० हजार रुपये लाच मागितली.

मात्र लाच म्हणून ३०,०००/-. देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा  नसल्याने त्यांनी प्राप्त तक्रारीवरून दिनांक १८.०५.२०२० रोजी केळेल्या पडताळणी कार्यवाही मध्ये तडजोडीअंती २५.०००/रु. लाचेची मागणी स्पष्ट झाल्याने तहसिल कार्यालय, ब्रम्हपुरी येथे पंचासमक्ष केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी राजेद्र विठोबाजी अतकरे, तलाठी, कार्यालय साजा क्र ४खेड मक्ता ता.ब्रम्हूपरी जिल्हा चंद्रपूर  यांना २५,०००/-रु. लाच रक्‍कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले

सदरची कार्यवाही ही श्रीमती रश्मी नांदेडकर, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक,ACBनागपुर, श्री.राजेश दुद्दलवार,अप्पर पोलीस अथिक्षक,ला प्र.वि.नागपुर तसेच पोलीस उपआधिक्षक, अविनाश भामरे,ला प्र वि.चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात निळेश सुरडकर, तसेच कार्यालयीन स्टाफ ना. पो. का संतोष येलपूलवार, पो.कॉ,संदेश वाघमारे,नरेश नन्नावेरे व चालक राहुल ठाकरे यांनी यशस्वी पार पाडली. 

यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी/कर्मचारी किता त्यांच्या वतीने कोणी इसमलाचेची मागणी करीत असल्यास लाच-लुचपत "प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, अस आवाहनकरण्यात येत आहे.