चंद्रपुर:त्या सील केलेल्या परिसरात नागरिकांची ग़ैरसोय - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ मे २०२०

चंद्रपुर:त्या सील केलेल्या परिसरात नागरिकांची ग़ैरसोय

चंद्रपुर(ख़बरबात):
2 मे ला चंद्रपुरातील कृष्णनगर परिसरात एक कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर पोलिस प्रशासनाने या संपूर्ण भागाला पूर्णपणे सील केले. त्यामुळे या भागातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद केले.ही दुकाने बंद केल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. प्रशासनाने नागरिकांना कुठलीही गैरसोय होणार नाही, तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाईल असे सांगितले होते. 

मात्र आद्यपही या भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा झाला नसून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भाजीपाला, दूध,तांदूळ, गहू, डाळ, तेल अशा अनेक जीवनावश्यक वस्तू नागरिकांना उपलब्ध होत नसून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


या परिसराला प्रशासनाने सील केले असले तरी, अंतर्गत भागातील मात्र परिस्थिती भयावह आहे, केरला कॉलनी भागात अजूनही काही नागरिक मुक्त फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या भागात सुद्धा बॅरिकेट्स लावावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे, विशेष म्हणजे महापौर, मनपा आयुक्त यांनी या भागाला अद्यापही भेट दिली नाही, तसेच येथे येऊन विचारपूस सुद्धा केली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.