उद्यापासून चंद्रपूरातील नाश्ता चहाची दुकाने होणार सुरु - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ मे २०२०

उद्यापासून चंद्रपूरातील नाश्ता चहाची दुकाने होणार सुरु


चंद्रपूर(खबरबात):
चंद्रपूरातील संचारबंदी शिथील करण्यात आली असून ठरावीक वेळेसाठी बाजारपेठ सुरु करण्यात आली आहे. असे असले तरी चहा आणि नाश्ताची दुकाने सुरु करण्याबाबत आदेश पारीत करण्यात आलेला नाही. परिणामी या छोट्या दुकानदारांचे नुकसाण होत. ही बाब लक्षात घेता पार्सल तत्वावर चहा नाश्ताची दुकाने सुरु करण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना दिल्यात या सुचना जिल्हाधिकारी मान्य केल्या आहेत. त्यामूळे आता उद्यापासून पार्सल तत्वावर चहा नाश्ताची दुकाणे ठरावीक वेळेत सुरु राहणार आहे.
कोरोनाच्या संकटामूळे संपुर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. मात्र आता ग्रीन झोनसह काही ऑरेंज झोन मधील संचारबंदी काही प्रमाणात शिथील करण्यात आली आहे. चंद्रपूरातही काही प्रमणात चंद्रपूरकरांना दिलासा देण्याचा प्रर्यत्न करण्यात आला असून काल पासून शहरातील बाजारपेठ ठरावीक वेळेसाठी सुरु करण्यात आली आहे.

मात्र यात चहा आणि नाश्ताची दुकाने वगळण्यात आली आहे. पहिलेच संचारबंदीमुळे मागील ५० दिवसांपासून हे दुकाने बंद असल्यामूळे या छोट्या व्यवसायीकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामूळे आता संचारबंदी शिथील झाल्याने दिलासा मिळण्याची अपेक्षा या व्यवसायिकांना होती मात्र चहा व नाश्ताची दुकाने सुरु करण्याबाबत आदेश न आल्याने या व्यावसायिकांची निराशा झाली आहे. तसेच चंद्रपूरात बाहेरुन आलेल्या नागरिकांचही चहा नाश्ताविना गैरसोय होत आहे.
तसेच चंद्रपूर जिल्हा चं दुकानदार असोसिएशन यांनीही दुकाने सुरु करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांना केली होती.हि बाब लक्षात घेता सामुहिक अंतर पाळत चंद्रपूरातील चहा व नाश्ताची दुकाने पार्सल तत्वावर सुरु करण्याची परवाणगी देण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना दिल्या होत्या जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनीही या सुचना मान्य केल्या आहे. त्यामूळे आता उद्यापासून पार्सल तत्वावर चहा व नाश्ताची दुकाने सुरु होणार आहे.