वाडीत ऑटो चालकांनी केले गरीबांना धान्य वाटप,सतीश जंगले यांच्या स्तुत्य उपक्रमाला सलाम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ मे २०२०

वाडीत ऑटो चालकांनी केले गरीबांना धान्य वाटप,सतीश जंगले यांच्या स्तुत्य उपक्रमाला सलाम

नागपूर:अरूण कराळे:
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला असून गरीब कामगारांचा दोन वेळच्या जेवनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे .शहरात अनेक सामाजिक संस्था,सेवाभावी संघटना,आर्थिक परिस्थिती मजबूत दानशूर व्यक्तींनी यापूर्वी अन्न-धान्यचे वाटप केले.

यात मोठ्या प्रमाणात चमकोगिरी व राजकीय हेतू साधण्याचाही पुरेपूर प्रयत्न केला.तर काहींनी कोणतीही प्रसिद्धी न करता सामाजिक बांधिलकी जप्त गरजूंची मदत केली.परंतु तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढल्यामुळे गरीबांचा उदरनिर्वाहचा प्रश्न बिकट झाल्याने उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.पुढील संभाव्य भयानक परिस्थिती लक्षात घेता शहरातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या डॉ.आंबेडकर नगरातील सुमारे ११० लोकांना धान्य वाटून ऑटो चालक सतीश जंगले यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडली.

लॉकडाऊनमुळे स्वतःचा ऑटो बंद असल्याने प्रपंच आर्थिक अडचणीत असतांनाही ऑटो चालक सतीशने आपल्या परिवाराची पर्वा न करता दुसऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवत ज्यांना आजच्या घडीला खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे अशा अडकलेल्या गोर-गरीबांना एक मदतीचा हात म्हणून सतीशने त्याचे मित्र गणेश नितनवरे,सुनील वानखेडे,विजय वाघमारे,राजेश देशभ्रतार यांच्या सहकार्याने तांदूळ,साखर,साबण,बिस्किट आवश्यक वस्तू वितरीत करून गोर-गरीबांचा आशीर्वाद घेतला.