सकाळ होताच तळीराम पोहचले दारू दुकानात: वाडीत दारूचे दुकान उघडण्याची वाट पाहणाऱ्यांना तळीरामना पोलिसांनी हुसकावले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ मे २०२०

सकाळ होताच तळीराम पोहचले दारू दुकानात: वाडीत दारूचे दुकान उघडण्याची वाट पाहणाऱ्यांना तळीरामना पोलिसांनी हुसकावले

नागपूर:अरुण कराळे:
राज्य सरकारच्या निर्णयानंतर दारू दुकान उघडण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित होताच वाडीतील दारू दुकानासमोर सोमवार ४ मे पासून सकाळ पासूनच मद्यपीनी गर्दी केली होती.वाढती गर्दी पाहता पोलिसांनी तळीरामाना हुसकावून लावले.
राज्यात दारू विक्रीची परवानगी देणार असल्याचे शासनाने घोषित करताच अति उताविळ दारू विक्रेत्यांनीही संपूर्ण माहिती किंवा नियमावली न पाहता रविवारी रात्रीच दुकानासमोर ग्राहकांना दारू विकत घेतांना शारीरिक अंतर ठेवावे यासाठी पांढऱ्या रंगाचे गोल तयार केल्याने तळीरामाचा त्यावर दृढ विश्वास बसला की उदया आपल्या दारू मिळणारच म्हणून सोमवारी सकाळ पासून मद्यपी दुकानासमोर येऊन रांगा लावत दुकान उघडण्याची वाट पाहू लागले,हळूहळू ही चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरताच शारिरीक अंतराची पर्वा न करता गर्दी दारू दुकानासमोर मोठी गर्दी झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच सकाळी ११ वाजता कंट्रोल वाडी येथील वाईन शॉप समोरील जमावाला हुसकावून लावल्याने हिरमुस होऊन मद्यपी घरी परतले त्यावेळी वाहतूक कोंडी झाली होती. दिवसभर वाईन शॉप उघडले नसल्याने तळीराम नाराज झाले.