डिफेन्स मधील बँक लुटण्याचा प्रयत्न फसला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ मे २०२०

डिफेन्स मधील बँक लुटण्याचा प्रयत्न फसला


चोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
नागपूर/ अरूण कराळे (खबरबात) 
वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या डिफेन्स ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी मधील  स्टेट बँक लुटण्याचा प्रयत्न फसला असून चोर  मात्र सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

 प्राप्त माहितीनुसार डिफेन्स ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी मधील स्टेट बँक बुधवार २० मे च्या मध्यरात्री  लुटण्याच्या उद्देशाने दोन अज्ञात तरुण बँकेत आले.बँकेचे  गेट व बँकेच्या हॉलचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला . हे सर्व सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे . बुधवारी बँक बंद झाल्यानंतर बँकेच्या हॉल व प्रवेशद्वाराला कुलूप लावले होते.त्याची चाबी सर्वीस मॅनेजर ला दिली होती . गुरुवार २१ मे रोजी जेव्हा बँकेचे कर्मचारी बँकेत आले .
 तेव्हा त्यांना प्रवेशद्वार व हॉलचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत दिसले .लगेच  याची माहीती वाडी पोलीस स्टेशनला देण्यात आली. वाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल लकडे घटनास्थळी दाखल झाले. बँकेतील सामान अस्ताव्यस्त झालेले होते . पुढील तपास वाडी पोलीस करीत असून अज्ञात आरोपीविरूद्ध ४५७ ,३८०,५११ ,३४ अन्वये गुन्हा दाखल केला. 
ऑर्डनन्स फॅक्टरीचा परिसर सुरक्षित  मानला जातो . डिफेन्स मध्ये जाणाऱ्या तिन्ही गेटवर कडक पहारा असूनही आरोपी परिसरात कसा काय  पोहचला  असे अनेक  प्रश्न स्थानीक नागरीक करीत आहे.