पैनगंगा नदीत ६० वर्षीय महिलेचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

पैनगंगा नदीत ६० वर्षीय महिलेचा मृत्यू
गौतम धोटे/आवारपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील तालुक्यातील सांगोळा येथील पैनगंगा या नदिच्या पात्राच्या पलीकडे महीलेचा मृतदेह पडलेल्या अवस्थेतील दिसल्याने येथील मोठी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्तर माहिती आहे की, कोरपना तालुक्यातील सांगोळा/अंतरगाव येथे काल परवा ही महिला नागरिकांना दिसली आणी येथील काही मनमिळावू नागरिकांनी या महिलेला पाणी बिस्किटे दिल्याची चर्चा आहे पण ही दुसऱ्याच दिवशीच या सांगोळा पैनगंगा नदीच्या पात्रात (वणी तालुक्यातील सिरपूर पोलिस ठाण्यात अंतर्गत ही महिला असल्याने मृत्यू चे नेमके कारण समजू शकले नाही. पण वेळेवर पाणी /जेवणाची व्यवस्था झाली नसल्याने हा प्रकार घडला आहे .