चंद्रपुर:८ वर्षाच्या बालकाद्वारे कोरोनाग्रस्तांकरीता ३० हजार रुपयांची मदत;जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला निधी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

चंद्रपुर:८ वर्षाच्या बालकाद्वारे कोरोनाग्रस्तांकरीता ३० हजार रुपयांची मदत;जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला निधी


चंद्रपूर /प्रतिनिधी:
 देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरीने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळत असुन आता व्रतेश गोठे या केवळ ८ वर्षाच्या बालकाने ३० हजार रुपयांचा निधी धनादेशाच्या स्वरूपात मा. जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला आहे. 

माऊंट कार्मेल कॉन्व्हेंटचा ५ व्या वर्गाचा विद्यार्थी असलेला व्रतेश विकास गोठे हा बाबुपेठ प्रभागातील रहिवासी असून, घरच्या संस्काराप्रमाणे त्याने आपल्या खाऊ करीता वर्षभरात ५००० रु. जमा केलेले होते. योगायोगाने १ मे महाराष्ट दिनाच्या दिवशी त्याचाही जन्म दिवस असल्याने आपल्या बाल मित्रांना बोलावून जन्म दिवस साजरा करण्याचे त्याने ठरविलेले होते, परंतु सध्या कोरोनाचा प्रादर्भाव सरू असल्याने जमा केलेल्या पैश्यातुन काही चांगले करता येण्याची इच्छा त्याने आपल्या घरच्यांना बोलून दाखविली. त्याच्या या इच्छेला दुजोरा देत त्याची आजी श्रीमती श्यामल बाबूरावजी गोठे सेवानिवृत्त मुख्याध्यापिका जिल्हा परिषद चंद्रपूर यांनीही २५००० रु. कोरोनाग्रस्तांसाठी देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार १ मे रोजी श्रीमती श्यामल गोठे, विकास गोठे, व व्रतेश गोठे यांनी मा.
जिल्हाधिकारी यांना एकूण ३०,००० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. अवघ्या आठ वर्षाच्या बालकाला देशावर असलेल्या संकटाची जाण असणे व त्यासाठी आपले काही योगदान देणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. त्याच्या या जाणीवेचे अनेक स्तरातुन अभिनंदन होत असून, देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव आज प्रत्येक घरात निर्माण होत असल्याचे हे एक उदाहरण म्हणावे लागेल.