कोरोनामुक्तीसाठी भद्रावतीच्या 2 मुस्लिम बालकांनी ठेवला रोजा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मे २०२०

कोरोनामुक्तीसाठी भद्रावतीच्या 2 मुस्लिम बालकांनी ठेवला रोजा
भद्रावती/शिरीष उगे
चंद्रपूर जिल्हा कायमचा कोरोणा मुक्त राहावा व जिल्ह्यात असलेला कथित कोरोना रुग्ण बरा व्हावा यासाठी भद्रावती शहरातील भंगाराम वार्डातील दोन मुस्लिम बालकांनी पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर रोजा ठेवला आहे. हमीज कयाज शेख वय ७ व यजदान समशेर शेख वय ८ वर्ष असे या लहानशा बालकाचे नाव आहे.
या दोघांनी एक दिवसाचा रोजा ठेवत चंद्रपूर जिल्हा कायमचा कोरोना मुक्त राहावा यासाठी अल्लाकडे प्रार्थना केली व रोजा सुटल्यानंतर शहरातील 250 कुटुंबांना खजूर, फळे व जेवणाचे वितरण करून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. संपूर्ण राज्यात कोरोनाव्हायरसने हैदोस घातला असून अनेक जिल्हे कोरोना ग्रस्त झालेले आहे. मात्र जिल्ह्यातील नागरिकांनी दाखविलेल्या संयमानेच कोरोणावर मात करण्यात यश येत आहे. मध्यंतरी जिल्ह्यात एका कोरोना ग्रंसताची बातमी आली होती त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. हा कथीत रुग्ण बरा व्हावा व जिल्हा कोरोना मुक्त रहावा यासाठी या बालकांनी रोजा ठेवून नागरिकांचे हित जोपासत कोरोणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी यापुढे संयम बाळगावा, शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे असे आव्हानही या दोन बालकांनी केले आहे. मुनाज शेख यांनी या बालकांनी रोजा ठेवल्याबद्दल कौतुक व अभिनंदन केले आहे