अनेक घरांचे नुकसान, वीज खांब तुटले; 15 शेळ्या ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मे २०२०

अनेक घरांचे नुकसान, वीज खांब तुटले; 15 शेळ्या ठार
गौतम धोटे/कोरपना
कोरपना तालुक्यातील वादळी वाऱ्यासह पावसाने थैमन नासह अनेकांचे घरांचे छप्पर उडाले आणी डाँ आबेडकर नगर येथील अक्षरशः पाच पोल लाइनचे तुटले दिवस भर उन्हाचे चटके देत अचानकपणे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावतात कोरपना वाशी यांना झोडपून काहाडले आज दुपारी 4 च्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याने आवारपुर येथील आरो प्लांट चे मोठे नुकसान झाले असून गावातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वृक्ष पडलेले आहेत.गावातील अनेक अनेक घरांच्या छप्परे उडालेले असून ठीकठिकाणी टिना पडलेल्या दिसून येत आहे. शेतमालाचे सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे.आवारपुर येथील सरपंच सौ. सिंधुताई परचाके यांनी लगेच आरो प्लांट आणि गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.डाँ बाबासाहेब आंबेडकर नगरामध्ये 5 च लाइनचे पोल तुटल्याने रात्र अंधारात रात्र काढावी लागत आहे
एकतर लॉकडाऊनमुळे लोकांच्या हाताला काम नाही. त्यातच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी चिंतेत राहिले आहेत. आधीच कोरोनाच्या त्रासाने आर्थिक संकटाच्या सामण्यात अदिच लोकांचे नुकसान झाले. सोनूर्ली (वन) येथील शेतशिवारात आज वादळी पाऊस झाला. त्यात विजा सुद्धा पडल्या, या वादळी पावसात सोनूर्ली येथील बंडू काकडे हे आपल्या शेळ्या घेऊन चारासाठी घेऊन गेले असता अचानक आलेल्या वादळी पाऊस आणि वीज पडल्यामुळे त्याच्यात त्यांच्या १५ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. यात त्यांचे ९०००० ते १००००० रुपयांचे नुकसान झाले.वृत्त लिहेपर्यंत कोणतेही शाशकीय कर्मचारी दाखल झाले नाही. नुकसानभरपाई ची मागणी करण्यात येत आहे.