शिधापत्रिका नसलेल्या 14 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूची किट वाटप l - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मे २०२०

शिधापत्रिका नसलेल्या 14 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूची किट वाटप lतलाठी कार्यालय नवेगावबांधचे उपक्रम

संजीव बडोले/नवेगावबांध

दिनांक 6 मे 2020.
नवेगावबाध:-covid-19 या कोरोनाव्हायरस च्या प्रादुर्भावामुळे गेल्या महिन्याभरापासून संचारबंदी व लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबांना रोजगार नसल्यामुळे दैनंदिन जीवन जगताना आर्थिक व इतर अडचणी येत आहेत. काम धंदे सर्व बंद असल्यामुळे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न सर्वसामान्य मजूर व गरीब नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे. अशावेळी केसरी व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत धान्याचे वितरण केले जात आहे. परंतु आज येथे ये दिनांक 6 मे रोज बुधवार ला ज्यांचे नाव राशन कार्डवर नाही. अशा व ज्यांचे राशन कार्डच नाही, अशा 14 कुटुंबांना नवेगावबाध येथील तलाठी कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंच्या कीट तलाठी कुंडलिक कुंभरे याच्या उपस्थितीत लाभार्थ्याना वाटप करण्यात आले आले यावेळी आनंद काशीवार व दीपक राऊत उपस्थित होते. शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या मदतीमुळे या गरीब कुटुंबांना मोठाच दिलासा मिळाला आहे.