122 रक्तदात्यांनी रक्तदान करुन दिला सामाजिक कार्यात हातभार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

122 रक्तदात्यांनी रक्तदान करुन दिला सामाजिक कार्यात हातभार

🔸पोलिस ठाणे पड़ोलीमार्फत रक्तदान शिबिर
चंद्रपूर/ प्रतिनिधी
पडोली पोलीस ठाणे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित रक्तदान शिबिरात १२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
संचारबंदीच्या काळात रक्ताचा अल्प पुरवठा व उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता आज दिनांक ५ मे रोजी पडोली येथील लोकसेवा मंगलकार्याल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पडोली, चिंचाळा,एम आय डी सी ताडाळी, मोरवा, साखरवाही,खुटाळा, वांढरी, देवाडा,छोटा नागपूर, अंभोरा, दाताळा, नागाळा जुनी पडोली येथील युवकांनी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं. पूर्ण 122 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबीर यशस्वी केले.
रक्तदात्यांचे मनोबल वाढविण्यासाठी यावेळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी सर व उपअधीक्षक नांदेडकर सर यांनी उपस्थिती दर्शवून सर्वांचे मार्गदर्शन केले व शिबिरास शुभेच्छा दिल्या.
यावेळी आयोजक पोलिस उपनिरीक्षक तुषार चव्हाण व लोणारे मेजर तसेच रक्तपेढी चे प्रभारी अमित प्रेमचंद सर व जाधव सर, डॉ सोनकुसरे, व सुशांत नक्षीने यांनी उपस्थित रक्तदात्यांचे आभार मानले. या कमी वेळात सर्व समाजसेवकांनी परिश्रम घेऊन शिबीर यशस्वी केले व सुरक्षित अंतर ठेवून संपूर्ण कार्यक्रम पार पाडला. महत्वाचे म्हणजे या शिबिरात युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.
या वेळी उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशनच्या रक्तदान क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी यांचे कौतुक केले.वसर्व आयोजक, सहकारी व रक्तदात्यांचे शतशः आभार मानले.