सावधान:त्याच्या एका हो ने खिसा झाला खाली;मात्र चंद्रपुर सायबर सेलच्या प्रयत्नाने १ लाख ४० हजार मिळाले परत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

सावधान:त्याच्या एका हो ने खिसा झाला खाली;मात्र चंद्रपुर सायबर सेलच्या प्रयत्नाने १ लाख ४० हजार मिळाले परत

Shadow of cybercrime on social media Bareilly News
चंद्रपूर(खबरबात):
देशभरातील लाखो कर्मचारी सध्या घरून काम करत आहेत. या कालावधीत टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेकांनी ऑफिसमधून रिमोट अॅक्सेसच्या माध्यमातून काम करण्याचा पर्याय स्वीकारलाय. या परिस्थितीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असून, गेल्या काही दिवसांत सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अनेकांचे सोशल मीडिया अकाऊंट ,सिमकार्ट्सड, ई अकाऊंटही हॅक झाले आहेत.

असाच काहीसा प्रकार चंद्रपुरात घडला, ०७ मे २०२० रोजी सास्ती, राजुरा येथील एका व्यक्तीस फोन आला की, तुमचे सिमकार्ड अपग्रेड करायचे
का? सदर व्यक्‍तीने त्यास होकार दिल्याने त्या व्यक्तीस काही SMS प्राप्त होवुन नंतर त्याचे सिमकार्ड एक दिवसाकरीता बंद झाले. सदर व्यक्‍तीचे बंद झालेले सिमकार्ड हे त्याचे ICICI बॅक खात्यासोबत जोडलेले होते.  फसवणुक करणारे अज्ञात आरोपीने फिर्यादी याचे मोबाईल नंबरचा उपयोग करुन त्याचे बॅक खात्यातील एकुण १ लाख ४० रुपये काढुन घेतले. 
फिर्यादीला संशय येताच यांनी ताबोडतोब सायबर सेल, चंद्रपुर येथे येवुन सविस्तर माहीती देवुन पोस्टे राजुरा येथे तक्रार दिल्याने अप क्र.२८७/२०२० कलम ४२० भादंवी कलम ६६ ड आयटी कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल केला. 

चंद्रपूर सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांनी त्या नुसार आपले तपास सूत्रे हलविले आणि गुन्ह्याच्या शोध घेण्यास सुरवात केली,लॉकडाऊन असल्याकारणाने पोलीस आरोपी पर्यंत  नियमभंग करून  पोहचू शकत नसल्याने चंद्रपूर पोलिसांनी आरोपीची माहिती व फिर्यांदिने दिलेली तक्रार ICICI बँकेला दिली, बँकेने सविस्तर तपास केला आणि ऑनलाईन फ्रॉडमधील (इंटरनेट बॅकींग) रक्‍कम १३ मे २०२० रोजी फिर्यादी यांचे बॅक खात्यामध्ये परत आली. या संपूर्ण चौकशीत लॉकडाऊनच्या काळात चंद्रपुर सायबर सेलची भूमिका महत्वाची ठरली. 

सध्या इंटरनेटचे युग असुन प्रत्येक नागरीक दैनंदिन जीवनामध्ये ईटरनेट व मोबाईलचा खुप मोठया प्रमाणामध्ये उपयोग करीत आहे. परंतू, इंटरनेट/ मोबाईचा वापर करताना दक्षता न घेतल्याने सायबर गुन्हे घडत असल्याचे दिसुन आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली सायबर सेल, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे. चंद्रपुर पोलीसांकडुन वेळोवेळी सायबर क्राईम जनजागृती मोहीम राबविण्यात येत
आहे. मोबाईल फोनवर कोणत्याही अज्ञात व्यक्‍तीला बॅक खाते किंवा वैयक्‍तीक माहीती शेअर करु नये तसेच ऑनलाईन व्यवहार करताना संपुर्ण दक्षता घेण्याचे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे.