येवला एस.बी.आय.ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्र बँक मित्र कामाची मदत..! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ एप्रिल २०२०

येवला एस.बी.आय.ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्र बँक मित्र कामाची मदत..!


येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला: येवला शहरात एस.बी.आय.ग्राहक सेवा केंद्र (बँक मित्र) ची मोठी मदत नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी होत आहे ग्राहक सेवा केंद्र ही भारत सरकारला समर्पित आहे.
सद्यस्थिती करोना व्हायरसची ची भयंकर स्थिती पाहता बँकांना भारत सरकारने दिलेल्या गाईडलाइन्स चे पालन करून संपूर्ण भारतवर्षात बँकेसह ग्राहक सेवा केंद्र (भारतीय स्टेट बँक) व्यवहार सर्वत्र सुरू आहे.
कोरोना विषाणू व्हायरसच्या या महामारीत सुद्धा  बँकेचे सहाय्यक म्हणुन बँक ग्राहक सेवा केंद्र(भारतीय स्टेट बँक),(बँक मित्र) यांची  ही मोठी मदत नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी होत आहे. माननिय पंतप्रधान मोदी साहेबांनी बँक कर्मचारी आणि ग्राहक सेवा केंद्र चे आभार मानले आहेत.
आधारा द्वारे रुपये दहा हजारा पर्यंत रक्कम ग्राहक खात्यातून काढली किंवा भरता येते तर वीस हजारापर्यंत भरली किंवा दुसऱ्या खात्यात जमा करता येते, जनधन बचत खाते उघडणे, अशी अनेक कामे ग्राहक सेवा केंद्र सकाळी ९:०० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सेवा देत असतात, तालुक्यासह शहरी ग्राहक वर्ग  भारतीय स्टेट बँकेला जोडला गेलेला आहे,तसेच अनेक शासकीय योजना असतात परिणामी जेष्ठ नागरिक ग्राहकांना  बँकेत जाऊन लांबच लांब रांगा पासून मुक्ती मिळाली आहे. ग्राहक सेवा केंद्रावर आलेल्या प्रत्येक ग्राहकांना सॅनिटायझर ने हात निर्जंतुकीकरण करून शासन योजनेतर्गत  पैसे काढणे किंवा भरणे व्यवहार सुरू आहे प्रत्येक ग्राहक सुरक्षित अंतर ठेवून आहे का? तोंडला माक्स लावलेले आहे का? याचीही दक्षता सेवा केंद्र घेत आहे.
एका भयंकर परिस्थितीतून देश जात असताना २१ दिवस लॉकडाऊन अजूनच अवघड झालंय नागरिकांना कुठलाही आर्थिक स्थितीला त्रास होणार नाही याची काळजी घेत शासनाने बँकेचे व्यवहार सर्वत्र सुरळीत सुरू केले आहे. 
 बँकेच्या बरोबरीने कदाचित त्या पेक्ष्या अधिक ताण बँकेच्या संलग्नित असलेले बँक मित्रा वर आहे. अतिशय खतरनाक करोना व्हायरसच्या दहशती खाली अतिशय कठीण व सावधपणे शहरातील (भारतीय स्टेट बँक)ग्राहक सेवा केंद्र संचालक मधुसूदन राका, विलास कांबळे, तुषार धनवटे व संपुर्ण भारतात बँकेने दिलेल्या गाईडलाइन्स प्रमाणे ग्राहक सेवा केंद्र सुरू आहे