३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे गूजरखेडे व दोन गावे झाली टँकरमुक्त गावे.! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० एप्रिल २०२०

३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे गूजरखेडे व दोन गावे झाली टँकरमुक्त गावे.!गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात समाधान

येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला: तालुक्यातील गुजरखेडे येथील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत आटल्याने गावात तीव्र पाणीटंचाई होती पाणीटंचाई आणि टँकर अशी ओळख असलेल्या प्रमुख गावांमध्ये गुजरखेडे गावाचा उल्लेख केला जात असे नोव्हेंबर पासुनच गावात टैंकरची सुरू करण्याची मागणी केली जात असे. गेल्या अनेक वर्षापासून टँकरच्या पाण्यावरच गावाची तहान भागवली जात होती. गूजरखेडे परीसरातील विखरणी, कातरणी, सोमठान देश विसापूर कातरणी आदि गावांना ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतुन पाणीपुरवठा केला जात आहे या योजनेच्या माध्यमातून शेजारील मुरमी, आडगाव रेपाळ गावातही ३८ गाव पाणी पुरवठा योजनेतुन पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे तालुक्यात सर्वप्रथम टँकरची मागणी करणारे मुरमी टँकरमुक्त झाले असून शेजारील आडगाव रेपाळलाही टँकरमुक्त करण्यास ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे यश आल्याने गुजरखेडे ग्रामस्थानीही आपले गाव ३८ पाणीपुरवठा योजनेला जोडण्यात येऊन शुद्ध पाणी पुरवठा केला जावा अशी मागणी येवल्याचे आमदार तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे केली होती.भुजबळांच्या आदेशाने ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे उपाध्यक्ष पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांच्या पुढाकाराने गूजरखेडे ३८ गाव पाणीपुरवठा योजनेला जोडून देण्यात आले गावातील तीव्र पाणीटंचाई पाहता लॉकडाउन काळातही गावाचा पाणी पुरवठा कायम स्वरूपी सुरु केला आहे.यामुळे गाव कायमस्वरूपी टँकरमुक्त झाले असून गावाला शुद्ध पाणीपुरवठा होणार असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे याप्रसंगी ३८ गाव पाणीपुरवठा योजना उपाध्यक्ष मोहन शेलार,कर्णा चव्हाण, लधर्मा पारखे, नारायण चव्हाण,संजय बच्छाव,सोपान चव्हाण, ३८ गाव पाणीपुरवठा व्यवस्थापक उत्तम घुले,ग्रामसेवक सतीश सोनवणे आदि उपस्थित होते.

"मतदारसंघातील गावे टँकरमुक्त होण्यासाठी प्रथम प्राधान्य द्या अशी सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी केली होती त्यानुसार गुजरखेडे आडगाव रेपाळ मुरमी ही गावे ३८ गाव पाणीपुरवठा योजनेला जोडल्याने टँकरमुक्त झाली आहेत भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाने ही योजना आजही नफ्यात असून सुरळीतपणे सुरु आहे".

- मोहन शेलार, उपाध्यक्ष ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, येवला उपाध्यक्ष ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, येवला.


..........
नमस्कार, PhonePe ₹ ने अगदी घरबसल्या पेमेंट करणे सहज शक्य केले आहे. तुम्ही सुद्धा यांस जरूर वापरुन पहा. हे एकदम जलद आणि 100% सुरक्षित आहे. तुम्ही पैसे पाठवणे, रिचार्ज, तुमची सर्व बिले भरणे इ. आणि बरेच काही अगदी सहजपणे घरबसल्या करू शकता.